वन्य प्राण्यांना कुत्रिंम पाणवठ्यांचा आधार नांद्रा वनविभाग क्षेत्रातील पाच कुत्रीम पाणवठ्यामधे किशोर पाटील यांच्या मार्फत निःशुल्क टँकरने पाणी

वन्य प्राण्यांना कुत्रिंम पाणवठ्यांचा आधार नांद्रा वनविभाग क्षेत्रातील पाच कुत्रीम पाणवठ्यामधे किशोर पाटील यांच्या मार्फत निःशुल्क टँकरने पाणी

नांद्रा (ता.पाचोरा ) ता.3 येथील वन विभागात 1400 हेक्टर क्षेत्रातील नांद्रा ,आसनखेडा ,बांबरुड(राणीचे),लाख ,नाईकनगर,पहाण,मोहाडी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वन्य प्राणी आहेत.या जंगलातील नैसर्गिक 3 माती बांधामध्ये आज हि पाणी आहे.तर उर्वरीत क्षेत्रातील 5 कुत्रीम पाणवठ्यांमधे तीन में पासुन येथील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य तथा संकल्प फाउंडेशन चे किशोर पाटील यांनी टँकरने वन विभागातील पाणवठ्यामधे निःशुल्क पाणीपुरवठा केला आहे.
रणरणत्या उन्हात अंगाची लाही लाही होत असतानाच पाण्यासाठी घश्याल कोरड पडणे स्वाभाविकच आहे.”जल हि जीवन है” उगाचच नाही म्हटले जातं.आपण बघतो उन्हाळा लागला म्हणजे शासन,प्रशासन पाण्याची तृष्णा भागविण्याकामी गतिमान होत असते काही सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तीही यात हिरहिरीने आपला पुढाकार नोंदवतात परंतु हे करण्यात मानवाला प्रथम प्राधान्य दिले जाते व नंतर पाळीव प्राणी व वन्य जीवांकडे लक्ष पुरविले जाते. मात्र नांद्रा वन विभागाच्या वन्य प्राण्यांची तहान भागविणेसाठी विशेष दखल घेत किशोर पाटील यांनी आपल्या टॅकरने निःशुल्क पाणीपुरवठा सुरू केला आहे.या वन क्षेत्रात निलगाय,काळविट,ससे,माकडे ,हरीण ,पक्षी मोठ्या प्रमाणावर आहेत. वन्यजीवांची संख्या व गरज बघता वन क्षेत्रात असलेल्या 3 नैसर्गिक मातीबांधामध्ये उपलब्ध पाणीसाठा बरा असला तरी या वन्यजीवांना सोयीचे व अधिकची भटकंती न करता वन क्षेत्रातच पाणी उपलब्ध होऊन त्यांची तृष्णा भागविण्यासाठी वन क्षेत्रातील 5 कुत्रीम पाणवठे वन विभागाअंतर्गत असलेले पाणवठे नियमित गरजेनुसार भरले जात आहेत .त्यामुळे वन्य जीवांना व पक्ष्यांना वेळीच व मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने त्यांची पाण्याची तहान भागविणेसाठीची सैरभैरता व भटकंती ओघानेच थांबली असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे या वन्यजीवांची तृष्णा जंगलातच भागविली जात असल्याने त्यांची शेताच्या बांधावरील पाण्याच्या हौदाकडे ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी होत असलेली वणवण हि कमी झालेली दिसते.
कोट.आपल्या हातुन मुक्या प्राण्यांची सेवा व्हावी या उदात्त हेतूने प्रेरित होउन मी प्रत्येक वर्षी माझ्या ने होईल तेवढे सहकार्य करत असतो.