जळगांव जिन्हा खो – खो स्पर्धा निवड व चाचणी

_जळगांव जिन्हा खो – खो स्पर्धा निवड व चाचणी_

जळगाव- महाराष्ट्र खो – खो असोसिएशनने 2023-24 ची कुमार / मुली विभागाची 49 वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो – खो स्पर्धासाठी जळगांव जिल्हा खो – खो असोसिएशनतर्फे सन 2023-24 ची कुमार / मुली गटाची निवड चाचणी व स्पर्धा दि . 26-11-2023 रोजी सकाळी 9 वाजता जळगांव जिल्हा क्रीडा संघ मैदान व . वा . वाचनालय या मैदानावर घेण्यात येणार आहे . वयोमर्यादा : – कुमार / मुली 18 वर्षाखालील दि . 30-12-2005 अथवा यानंतर जन्मलेले कुमार / मुली खेळाडू . मुल्यांकन : – कुमार / मुली वय ( वर्षे ) + उंची ( सेमी ) + वजन ( किलोग्रॅम ) = 250 कुमार / मुली खेळाडूंचा जन्म तारखेचा मुळ दाखला आणणे आवश्यक आहे . एस . एस . सी . व एच . एस . सी चे मुळ प्रमाणपत्र किंवा हॉल तिकीट सादर करणे . कुमार / मुली खेळाडू जास्तीत जास्त सिनियर प्रथम वर्ष अथवा खालील शिकत असला पाहिजे . तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी मा . आ . प्रा . चंद्रकांत सोनवणे , प्रा . डी . डी . बच्छाव , शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री . गणपतराव पोळ , उदय पाटील , सुनिल समदाणी , जयांशु पोळ , सौ . विद्या कलंत्री . अधिक माहितीसाठी संपर्क राहुल पोळ – 9404292714 , दत्ता महाजन 7020751823 , अनंता समदाणी- 9403514568 , एन . डी . सोनवणे- 9420388851 , विशाल पाटील – 9970308326 .