पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या विरोधात दि.05ऑक्टोंबर/ 2021 रोजी उपोषण
संदर्भ:- 1) प्रभाग क्रमांक 3 त्र्यंबक नगर मधील गटारी व रस्ते संदर्भात आपल्याला दिनांक 15 सप्टेंबर 2021
2) दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी दिलेल्या तक्रार अर्ज बाबत…
विषय:- प्रभाग क्रमांक 3 त्र्यंबक नगर मधील गटारी व रस्ते नवीन बनविण्याबाबत…
अर्जदार:- प्रशांत रामदास पाटील रा. त्र्यंबक नगर पाचोरा (मो.नं 8888744729)
मा. महोदय
प्रभाग क्रमांक 3 त्र्यंबक नगर मध्ये गटारींची झालेली अवस्था अतिशय खराब आणि दयनीय झालेली आहे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे , नगरपरिषदेतं वारंवार तक्रार देऊन सुद्धा हे काम झाले नाही गेल्या चार महिन्यापूर्वी एका गटारीचे काम करण्यात आले होते पहिल्याच पावसात पूर्ण गटार जमीनदोस्त झाली आहे निकृष्ट दर्जाचे झालेले काम यावर मुख्याधिकारी साहेब यांनी तात्काळ कारवाई करावी व त्रंबक नगर मधील रस्ते व गटारी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून झालेले नाही तरी आपण तात्काळ गटारी व रस्त्याचे काम मार्गी लावावे नगरपालिकेच्या बांधकाम विभाग व आरोग्य विभाग या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे तरी आपण स्वतः या कामाकडे वैयक्तिक लक्ष देऊन हे काम मार्गी लावावे. येणाऱ्या पंधरा दिवसात एक ऑक्टोंबर पर्यंत गटारीचे काम व रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा होणाऱ्या पुढील परिणामाला नगरपालिका व मुख्याधिकारी हे जबाबदार राहतील अशी नम्र विनंती (टीप:- असा अर्ज आपल्याला 15/सप्टेंबर/2021 रोजी दिलेला होता)
आपल्याला दिनांक 15/सप्टेंबर/2021 रोजी गटारी व रस्ते संदर्भात तक्रार अर्ज दाखल केला होता. आपल्या नगरपालिकेकडून व बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारचे आम्हाला कळविण्यात आलेले नाही व अर्जाची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही.
त्यासाठी आपल्याला आमच्याकडून 20/सप्टेंबर/2021 रोजी तक्रार अर्जाचे पहिले स्मरण पत्र (Reminder 1st) दिलेले आहे. तरीसुद्धा नगरपालिका मुख्याधिकारी व बांधकाम विभाग यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अर्जाची दखल घेण्यात आलेली नाही.
पाचोरा न.पा. प्रशासन यांना वारंवार अर्ज फाटे करून माझे अर्ज फाट्यावर मारण्यात आले आहे. अर्जाला दोन ते तीन रिमाइंडर देण्यात आले आहे. त्र्यंबक नगर हे पाचोर्यातच येते ना का वेगळे ग्रहावर येते याचा प्रश्न आम्हा त्र्यंबक नगरवासी यांना पडलेला आहे.
गेली वीस वर्षे झाले त्र्यंबक नगर मधील काही रहिवासी त्यांचा टॅक्स हा वेळेवर भरतात. आज का टॅक्स ची रक्कम वीस वर्षांमध्ये एवढी झाली आहे किती स्वखर्चातून बेसिक गरज जसे गटारी बनवणे व रस्ते बनवणे हे तर नक्कीच करु शकले असते पण गेल्या वीस वर्षांमध्ये त्र्यंबक नगर मध्ये ना रस्ता झाला गटारी झाल्या. भुयारी गटारी आहे ते रस्ते सुद्धा खोदून ठेवून under ground गटारीचे लोलिपोप दिले. अद्याप तेही काम अर्धवट सोडून कॉन्ट्रॅक्टर तिच्या माहेरी पळून गेला आहे.
म्हणून आज दिनांक 27/सप्टेंबर/2021 रोजी आपल्याला दुसरे स्मरण पत्र देत आहे वरील मागण्यां येणाऱ्या 04/ऑक्टोंबर/2021 पर्यंत काम सुरू न झाल्यास मी प्रशांत पाटील व आम्ही सर्व त्रंबक नगर रहिवासी दिनांक 5/ऑक्टोंबर/2021 तारखेपासून आमरण उपोषणाला नगरपालिके समोर बसणार आहे. तरी आपण त्वरित स्वतः वयक्तिक दखल घेऊन काम सुरू करावे अशी नम्र विनंती
(टीप-05/ऑक्टोंबर/2021 नगरपालिकेच्या समोर किंवा तहसील ऑफीस समोर एक मंडप टाकून कोरोनाचे नियम पाळून उपोषणास बसण्यास परवानगी देण्यात यावी अशी विनंती)
आपले ऋणी,
श्री. प्रशांत पाटील व सर्व त्रंबक नगर रहिवासी.
माहिती साठी प्रत
मा.आ किशोर धनसिंग पाटील (पाचोरा-भडगाव)
मा. संजय गोहील नगराध्यक्ष साहेब (पा. नगरपालिका)
मा.जिल्हाधिकारी सो,जळगाव
मा.प्रांत अधिकारी साहेब,पाचोरा
मा.तहसीलदार साहेब, पाचोरा
मा.पोलीस अधीक्षक साहेब पाचोरा