वाहन चालक मालक बांधवांसाठी कल्याणकारी मंडळाची घोषणा जय संघर्ष संस्थेच्या मागणीला यश 

वाहन चालक मालक बांधवांसाठी कल्याणकारी मंडळाची घोषणा जय संघर्ष संस्थेच्या मागणीला यश

यश दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मांडला त्या अर्थसंकल्पामध्ये वाहन चालक मालक बांधवांसाठी कल्याणकारी मंडळाची घोषणा सुद्धा करण्यात आली त्याबद्दल जय संघर्ष ग्रुप तर्फे सरकारचे अभिनंदन केले व जय संघर्ष ग्रुप चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री प्रविण वाघ यांना पेढे भरून जय संघर्ष ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद साजरा केला जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संघटनेची मागणी ही २०१७ पासून लावून धरलेली होती एकूण 11 मागण्या होत्या त्यापैकी एक मागणी मान्य झाल्यामुळे बाळासाहेब ठाकरे अपघात योजना ही सुद्धा बदल करून त्यामध्ये रक्कम वाढवून अपघातग्रस्त लोकांना मदत होईल ही सुद्धा मागणी जय संघर्ष ग्रुपने वेळोवेळी लावून धरले आहे कल्याणकारी महामंडळ ची जय संघर्ष ग्रुप सतत निवेदने मोर्चे उपोषणे वेळोवेळी निवेदन दिले जय संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे भर पावसात पाच दिवस उपोषण केले होते,नागपूर मोर्चा पुणे,मोर्चा मुंबई व महाराष्ट्रभर वेळोवेळी जय संघर्ष ग्रुपच्या पदाधिकारी निवेदन दिले होते आजी माजी मुख्यमंत्री मा श्री एकनाथराव शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब त्यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेले होते व सरकारकडून या निवेदनचा पाठपुराणा करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आले होते व जय संघर्ष ग्रुपने सतत मागणी लावून धरल्याने वाहन चालक मालक रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ अस्तित्वात येईल असे जय संघर्ष ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रवीण वाघ यांनी सांगितले व यावेळी रहेमान दादा तांबोळी,श्री तुषार पाटील,शाकीर शेख,हर्षल पाटील, निसार शेख,अण्णा माळी,इम्रान तांबोळी,रिजवान कुरेशी,सोनू बोरसे, हनुमंत आहिरे,रईस शहा मयुर पाटील, यांनी अभिनंदन केले व जय संघर्ष ग्रुपने केलेले काम सार्थ झालं सरकारच्या आभार मानले व जय संघर्ष ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री प्रविण वाघ यांनी संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर सर व सर्व जय संघर्ष संस्थेचे संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांचे आभार मानले.व उर्वरित मागण्यांसाठी लवकरच आंदोलन करण्यात येईल असे सांगितले.