चोपडा महाविद्यालयात ‘जाहिरातींचे विश्व’ या विषयावर पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

चोपडा महाविद्यालयात ‘जाहिरातींचे विश्व’ या विषयावर पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

 

चोपडा. येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे आज दि. १२ एप्रिल २०२३ रोजी ‘जाहिरातीचे विश्व’ या विषयावरील पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मराठी विषयाच्या अभ्यास मंडळाचे प्रमुख प्रा.डॉ.के.एन.सोनवणे तसेच प्रा. एम. जी. पाटील, सौ.एम.टी.शिंदे, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सी.आर.देवरे, हिंदी विभाग प्रमुख व हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.ए.बी.सूर्यवंशी, डॉ.एम.एल.भुसारे, डी.एस.पाटील, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.आर. पाटील, एन.एस.बोरसे, पी.आर.पाटील, चेतन बाविस्कर, मुन्ना साळुंखे आदि मान्यवर उपस्थित होते.

या पोस्टर प्रदर्शनात प्रामुख्याने प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रात ‘जाहिरात लेखन’ आणि ‘मुलाखतीचे तंत्र’असा अभ्यासक्रम विद्यापीठातर्फे नेमण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या आधारावर प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी जाहिराती, जाहिरातीचे प्रकार, संकल्पना, जाहिरातीची कलात्मकता, शब्दरचना, हेतू, जाहिरातीची भाषाशैली अशा विविध विषयांवर पोस्टर तयार केले. या प्रदर्शनात जवळपास ५० विद्यार्थ्यांनी पोस्टर सहभाग नोंदवला होता.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी यांनी सर्व पोस्टरचे निरीक्षण केले तसेच विद्यार्थ्यांना ‘आजच्या आधुनिक जगात जाहिरातींचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी या पोस्टर प्रदर्शनास कला, शास्त्र व वाणिज्य विभागातील एकूण १५० अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली व ‘जाहिरातीचे विश्व’ याविषयीची माहिती करून दिली.यावेळी वाणिज्य विभागातील प्रथम वर्ष वर्गातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.