पाचोरा:हुतात्मा स्मारक या ठिकाणी प्रवासी महासंघ ग्राहक पंचायतीच्या वतीने बैठक संपन्न

पाचोरा:हुतात्मा स्मारक या ठिकाणी प्रवासी महासंघ ग्राहक पंचायतीच्या वतीने बैठक संपन्न

आज दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी पाचोरा शहरातील हुतात्मा स्मारक या ठिकाणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अंतर्गत प्रवासी महासंघाची बैठक संपन्न झाली असून यामध्ये ग्राहक पंचायत चे विभागीय संघटक संजय शुक्ल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करणे ग्राहक चळवळ सामान्य नागरिक पर्यंत पोहोचवणे चोपडा या ठिकाणी एक दिवशी अभ्यासाकाचे आयोजन करणे त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यातील ग्राहक संरक्षण समितीवर चार नावे जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पाठवणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून यावेळी सूत्रसंचालन पत्रकार शांताराम चौधरी सर यांनी केले होते त्याचबरोबर पाचोरा येथील ज्येष्ठ समाजसेवक अनिल आबा येवले यांच्यासह,जिल्हा संघटक राजेंद्र शिंपी,जिल्हा कार्यकारी संघटक प्राध्यापिका वैशाली बोरकर. नयना शेंडे  ,इतर कार्यकारी सदस्य या ठिकाणी उपस्थिती होते.