लोकांच्या प्रश्नांवर काम करताना समाजाचे मन समजून घेउन काम केले पाहिजे : प्रतापराव ढाकणे

लोकांच्या प्रश्नांवर काम करताना समाजाचे मन समजून घेउन काम केले पाहिजे : प्रतापराव ढाकणे

‌ (सुनिल नजन “चिफ ब्युरो “अहमदनगर जिल्हा) आजकाल लोकांच्या प्रश्नांवर काम करताना समाजाचे मन समजून घेउन काम केले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रांतीक सरचिटणीस अॅडहोकेट प्रतापराव ढाकणे यांनी केले .ते कार्यकर्ते व पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमात सहभागी होताना बोलत होते. ढाकणे पुढे म्हणाले की आज प्रत्येकाला नेता होण्याची घाई झाली आहे.सामाजिक काम करताना मी कोणाच्या तरी उपयोगी पडतो.माझ्यामुळे कोणाला तरी मदत होते याचे आत्मसमाधान मला मिळते.वाचनामुळे माझे व्यक्तिमत्व घडले आहे. वाचनाची आवड ही वडिलांकडून मिळाली.वाचनामुळे व्यक्तीमत्वाची जडणघडण झाली. वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांशी संपर्क आला.केवळ पद मिळविणे म्हणजे राजकारण नाही तर लोकांच्या प्रश्नांवर काम करुन मोठे होत येते हे मी अनुभवले आहे.मला प्रतिगामी आणि पुरोगामी विचारांची देणगी मिळाली.नशिबात चांगला मित्र परिवार मिळाला. स्व.बबनराव ढाकणे यांच्यामुळे मोठ मोठ्या राजकीय लोकांच्या सहवासात राहून राजकारणाचे धडे गिरवायला मिळाले.म्हणून तर मी आज समाजात ताठ मानेनं उभा आहे.खरतर राजकारणा पासून कोणीही अलिप्त राहू शकत नाही.सामाजिक चळवळीत सहभागी झाल्या मुळे आज मला समाजकारण करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत.तसेच लोकांच्या अडचणी समजावून घेवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असल्याने मनाला समाधान मिळत असल्याचे अॅडहोकेट प्रतापराव ढाकणे यांनी सांगितले. कोणी कोठेही उड्या मारल्या तरी मी शेवट पर्यंत शरदचंद्र पवार यांची साथ सोडणार नाही असेही त्यांनी सांगितले .