डॉ.वैष्णवी महाजन नानासो.संजय वाघ यांचे हस्ते सन्मानित

डॉ.वैष्णवी महाजन नानासो.संजय वाघ यांचे हस्ते सन्मानित

पाचोरा – गणित विषयात जे.जे.टी. यु. येथुन सर्टन इन्वेस्टीगेशन ऑफ अल्जेब्रिक स्ट्रक्चर ऑफ ग्रुप्स अँड रिंग्स या विषायात संशोधन करून वयाच्या २६ वर्षी पी.एच.डी. प्राप्त केल्याबद्दल डॉ. वैष्णवी महाजन यांना पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासो.संजय वाघ आणि तनिष्का गटाच्या अध्यक्षा सौ.ज्योती वाघ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
डॉ. वैष्णवी संदीप महाजन यांनी पीएचडी पदवी संपादन करत असताना पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधुन गणितात ए+ पदवी तर एम.एस्सी. सुद्धा ए+ श्रेणीत उत्तीर्ण केले असून तसेच बी. एड. ए.++श्रेणीत उत्तीर्ण होऊन पाचोरा तालुका आणि शहरासाठी दैदिप्यमान कामगिरी केली असल्याचे मत संजय वाघ यांनी व्यक्त केले.
डॉ.वैष्णवी महाजन या शहरातील रहीवाशी स्वातंत्र्य सैनीक पाचोरा न.पा. माजी ऑक्ट्रॉय इन्स्पेक्टर स्व. दामोदर लोटन महाजन यांच्या नात असून ध्येय करिअर अँकेडमीचे संचालक संदीप दा. महाजन आणि श्री . गो. से.हायस्कूलच्या इंग्रजी विषयाच्या उपशिक्षीका सौ.शितल सं. महाजन यांच्या जेष्ठ कन्या आहेत.डॉ. वैष्णवी हल्ली पाचोरा येथील श्री. शेठ एम. एम. कॉलेजमध्ये सिनीअर कॉलेजला तिन वर्षा पासुन गणित विभाग प्रमुख म्हणुन कार्यभार सांभाळत आहेत.