उर्दू शाळा नगरदेवळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन
उपक्रमशील शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्हा परिषद उर्दू शाळा नगरदेवळा (ता. पाचोरा) येथे गुरुवारी शैक्षणिक साहित्य (शिष्यवृत्ती मार्गदर्शन संच) वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठण, हम्द आणि नात-ए-पाकने झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शेख अफरोज रहीम होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक एहतशाम शेख, अब्दुल खालिक ठेकेदार आणि अश्फाक मजीद उपस्थित होते. शेख जावेद रहीम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले.
अहतेशाम शेख यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यश मिळवून देण्यासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक या तिन्हींमधील परस्पर समन्वयावर त्यांनी भर दिला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात शेख अफरोज यांनी शाळेत आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी आणि मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांच्या प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले.
अश्फाक मजीद: “येणारा काळ हा स्पर्धा परीक्षांचा आहे आणि त्याची खरी सुरुवात चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीपासून करणे उत्तम आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी, २६ एप्रिल रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या सर्व १६ विद्यार्थ्यांना अब्दुल खालिक ठेकेदार यांच्या वतीने मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुस्तकांचे संच वाटप करण्यात आले.
या प्रसंगी उपाध्यक्ष शेख अफरोज रहीम, एहतशाम शेख, मजहर बागवान, मुशताक खान,सय्यद इमरान अली, अश्फाक मजीद, अब्दुल गनी शेख, उमर बेग, नासिर मण्यार, अकील शेख, पत्रकार हसीबुर रहमान आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक रफीक निसार, शेख अजहरोद्दीन, नवीदा अंसारी, शेख जावेद रहीम, रिजवान शेख, खलील शेख आणि सना अंसारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शेख जावेद रहीम यांनी केले.























