नांद्रा येथे बँक ऑफ बडोदा तर्फे प्रधानमंत्री विमाचे वारसांना धनादेश वाटप

नांद्रा येथे बँक ऑफ बडोदा तर्फे प्रधानमंत्री विमाचे वारसांना धनादेश वाटप

नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी) येथे नांद्रा परिसरातील सात खेडे लागून असलेल्या मुख्य बँक ऑफ बडोदा शाखा नांद्रा येथे अनेक परिसरातील गावातील खातेदार यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना यांचे 12 रुपये व 330 रुपये असे विमा काढलेले आहेत,यामध्येच काही दिवसापूर्वी आसनखेडा येथील मृतक व्यक्ती प्रभाकर आधार पाटील यांचा सर्प चावल्याने मृत्यू झाला होता त्यांचे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना योजना 12 रुपये व प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना 330 रुपये असे दोघं विमा त्यांनी काढले होते त्यामुळे त्यांच्या वारस पत्नी श्रीमती सुवर्णा प्रभाकर पाटील यांना एकूण दोघं दोन दोन लाख मिळून एकूण 4 लाखाचा धनादेश व प हान येथील मृतक समाधान सजन पाटील यांचा ही अपघातात मृत्यू झाला होता त्यांचाही 12 रुपयाचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा काढला असल्याने त्यांची वारस पत्नी कमलबाई समाधान पाटील यांनाही 2 लाखाचा धनादेश आज सरपंच बंटी सूर्यवंशी, माजी सभापती नितीन दादा तावडे,मंडळ अधिकारी पगार रावसाहेब यांच्या हस्ते बँकेत देण्यात आला याप्रसंगी गावातील सरपंच बंटी सर सूर्यवंशी उपसरपंच शिवाजी तावडे माजी सभापती नितीन तावडे, मंडळ अधिकारी पगार रावसाहेब ग्रामपंचायत सदस्य सुभाष तावडे, विनोद तावडे,योगेश सूर्यवंशी, भाऊसाहेब बाविस्कर, आनंदा पेंटर, दिलीप सोनवणे बालू सूर्यवंशी, किशोर खैरनार, पत्रकार प्रा. यशवंत पवार पत्रकार नागराज पाटील,पत्रकार राजेंद्र पाटील,पोलीस पाटील किरण तावडे,प्रमोद सूर्यवंशी,पिंटू भाऊ बोरसे व गावातील ग्रामस्थ व परिसरातील खातेदार उपस्थित होते याप्रसंगी शाखा व्यवस्थापक आकाश खरात यांनी दुर्दैवाने कोणाच्याही घरात असा आकाश मी प्रसंग आल्यावर किमान दोघं विमान पैकी एक विमा तरी बँकेत काढणे गरजेचे असल्याचे सांगितले याप्रसंगी बँक व्यवस्थापक आकाश खरात,बँक अधिकारी दीपक गुप्ता, सुहास सपकाळे,श्रेयस सोळी,बँक मित्र दिलीप पाटील संदीप पाटील हे उपस्थित होते