चोपडा महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी वैभवी ठाकरे हिची मंत्रालय सहाय्यक म्हणून निवड 

चोपडा महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी वैभवी ठाकरे हिची मंत्रालय सहाय्यक म्हणून निवड

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी तसेच देशमुख नगर ,चोपडा येथील रहिवासी कु.वैभवी राजेंद्र ठाकरे हिने नुकत्याच महाराष्ट्र लोक सेवा आयोग यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. यामध्ये तिची मंत्रालय सहाय्यक म्हणून स्तुत्य निवड झाली आहे.विशेष म्हणजे याआधीही तिची STI या पदासाठीही दोन वेळा निवड झाली आहे. कु .वैभवी ठाकरे ही डॉ. दादासाहेब सुरेश जी.पाटील महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी आहे. तिच्या या निवडीबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी तिचे वडील डॉ.राजेंद्र ठाकरे,आई सौ.सुषमा ठाकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सुर्यवंशी ,कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.ए.एन.बोरसे, समन्वयक प्रा.पी.एस. पाडवी, प्रा.ए.आर.पाटील आदि उपस्थित होते. कु.वैभवी ठाकरे हिने मिळविलेल्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या स्तुत्य निवडीबद्दल महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.