नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत बांधण्यासाठी’ची वर्क ऑर्डर अखेर प्राप्त जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांच्या प्रयत्नांना यश

नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत बांधण्यासाठी’ची वर्क ऑर्डर अखेर प्राप्त – येत्या पंधरा दिवसाच्या आत आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या शुभहस्ते भुमिपुजन करून बांधकामाला होणार लवकरच सुरूवात

जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांच्या प्रयत्नांना यश

कोरोना मुळे निधी अभावी मंजुर असुनही रखडले होते काम -अंदाजित ३ कोटी ९२ लाख ३२ हजार ८२५ रू निधी….!

पाचोरा प्रतिनिधी : कुरंगी-बांबरूड जिल्हा परिषद गटातील नागरीकांसाठी आरोग्याचे प्रमुख व मुलभुत स्त्रोत असलेली जीवनवाहिका – अर्थातच नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्र !! गोरं – गरीब जनतेच्या उपचारांचे मुख्य प्रवाह – गेले अनेक वर्षापासुन सोयी-सुविधा लोकसंख्येच्या मानाने अपुरे ठरत असल्याने परीसरातील रूग्णांची गैरसोय होत असते आणि गेल्या अनेक वेळा विविध माध्यमातुन हे प्रश्न चव्हाट्यावर व वेळोवेळी समोर आलेले आहेत.सेवे सोबत सुविधा देखील अडचणींचा भाग ठरलेल्याने नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्र हे जिल्ह्यात अनेकवेळा विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत होते.

नेहमीचं परीसरातील नागरिक सेवा व सुविधा मुळे त्रस्त होत असल्याने ते जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांना फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटुन त्यांच्या तक्रारी व अडचणी मांडुन आपली खंत व व्यथा मांडत असत.अशा वेळी काय करता येईल ? जेणेकरून कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवता येईल का ? असा दुरदृष्टी विचार ठेऊन अशी पण इमारतीचे बांधकाम फार जुने व धोकादायक आणि जिर्ण स्थितीत असल्याने मोठी दुर्घटना भविष्यात घडु शकते ? अशा घटनेत कुठलेही जीवीतहाणी होऊ नये आणि सर्व सेवा सुविधा आपल्या परीसरातील २०-२२ गावांना प्राप्त व्हाव्यात यासाठी नवीन इमारत सेवायुक्त जर बांधली तर नक्कीच हा प्रश्न सुटु शकतो ? हा चंग पदमबापु यांनी मनाशी बांधुनी वेळोवेळी पाठपुरावा करून आणि प्रयत्न अखंडीत लावुन धरून अखेर यश मिळवले आणि नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राचे नवीन अशी प्रशस्त इमारतीसाठी मंजुरी मिळवली.

मंजुरी झाली पण कोरोना आल्याने निधी उपलब्ध होत नसल्याने पुन्हा हे काम दोन वर्ष रखडले आणि शेवटी उशीरा का होईना पण आमदार किशोरआप्पा पाटील यांनी मार्गदर्शन व पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून दिला आणि अखेर या कामाची वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे.अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांनी दिली आहे.

या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी – ३ कोटी ९२ लाख ३२ हजार ८२५ रू खर्च होणार असुन भव्य अशी सुंदर सेवा युक्त इमारत नागरीकांना व रूग्णांना उपचारासाठी मिळणार आहे.एवढेच नव्हे तर सर्व होणारी गैरसोय आणि त्रास दुर होण्यात मदत होणार आहे.रूग्णसंख्या जास्त आणि बेड संख्या अपुर्ण ? हा प्रकार यापुढे होणार नाही अशी सुविधा या इमारतीतुन मिळणार आहे.

लवकरच येत्या १५ दिवसांच्या आत आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या शुभहस्ते या कामाचे भुमिपुजन करून या शुभ कार्याची सुरुवात करण्यात येणार आहे.निधी व वर्क ऑर्डर प्राप्त झाल्याने आणि काम १५ दिवसांत सुरू होणार असल्याने कुरंगी – बांबरूड जिल्हा परिषद गटांमधील नागरीकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.फक्त ठेकेदारांनी बोगस व निकृष्ट काम करू नये- लक्ष व काळजी घ्यावी अशी मागणी नागरीकांकडुन होत आहे.