पाचोरा तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना लॅपटॉप व प्रिंटर वाटप
पाचोरा, दि. २ एप्रिल २०२६ – तहसील कार्यालय, पाचोरा येथे आज पाचोरा तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना लॅपटॉप व प्रिंटर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास पाचोरा/भडगाव विधानसभेचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील, उपविभागीय अधिकारी मा. श्री. भूषण अहिरे, तहसीलदार श्री. विजय बनसोडे, निवासी नायब तहसीलदार श्री. विनोद कुमावत व नायब तहसीलदार (महसूल) श्री. प्रमोद मोरे उपस्थित होते.
यावेळी मा. आमदार श्री. किशोर आप्पा पाटील व उपविभागीय अधिकारी श्री. भूषण अहिरे यांच्या हस्ते मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना एकूण २१ लॅपटॉप व ६१ प्रिंटरचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन निवासी नायब तहसीलदार श्री. विनोद कुमावत यांनी केले. कार्यक्रमादरम्यान मा. आमदार श्री. किशोर आप्पा पाटील, उपविभागीय अधिकारी श्री. भूषण अहिरे तसेच तहसीलदार श्री. विजय बनसोडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे महसूल विभागाच्या कामकाजात गती व कार्यक्षमता वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार श्री. विनोद कुमावत यांनी पाचोरा तालुक्यासाठी लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांचे आभार मानले.

























