चोपडा महाविद्यालयात एक दिवशीय एस.वाय. बीएस्सी. इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात एक दिवशीय एस.वाय. बीएस्सी. इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात संपन्न

चोपडा: येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तसेच महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा इलेक्ट्रॉनिक्स विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने ‘एकदिवसीय एस.वाय. बीएस्सी. सेमिस्टर चौथे अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उदघाटन फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी. वाघुळदे यांच्या दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी हे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.एम. एन.लिदुरे व उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच विभाग प्रमुख प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.एम.पी.भोळे, डॉ.के.डी. गायकवाड, डॉ.जी.डी. देशमुख व डॉ. एल.बी. पटले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख तसेच इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.ए. एल.चौधरी म्हणाले की, ‘इलेक्ट्रॉनिक्स विषयांमधील अभ्यासक्रम तयार करताना प्रात्यक्षिक व कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमावर भर दिला असून विद्यार्थ्यांच्या नवनिर्मिती क्षमतेला यातून चालना मिळेल तसेच अभ्यासक्रमात नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी अभ्यासक्रम कसा करता येईल यावर भर द्यावा असे आव्हान केले’.
या कार्यशाळेप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांमधून इलेक्ट्रॉनिक्स विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घेतला.
याप्रसंगी उदघाटनपर मनोगत व्यक्त करताना फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे म्हणाले की, ‘इलेक्ट्रॉनिक्स विषयाचा अभ्यासक्रम नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 20 20 नुसार केल्यास विद्यार्थ्यांना विविध कौशल्य मिळतील व त्यामुळे नवीन रोजगार मिळतील तसेच स्वतःचे कौशल्य वापरून नवीन उद्योग सुरू करण्यास सदर अभ्यासक्रम असा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तयार करण्यात यावा’.
या अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेत प्रसंगी अभ्यासक्रम तयार करण्याच्या सत्राचे सूत्रसंचलन डॉ.के.डी. गायकवाड यांनी केले. या सत्रात बेसिक ॲनालाग व डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स पासून तर आरडी नो व त्याचा वापर तसेच इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या रोजच्या व्यवहारात उपयोग इत्यादी नऊ पेपर्स वर चर्चा करून अभ्यासक्रम तयार करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी म्हणाले की, ‘इलेक्ट्रॉनिक्स हा विषय विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती क्षमता रुजवणारा असून त्यातून येणाऱ्या काळात निश्चितच विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्या अनुषंगाने अभ्यासक्रम निर्माण केल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल यात शंका नाही’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.पुनम गायकवाड यांनी केले तर आभार डॉ.एल. बी. पटले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.पुनम गायकवाड, निशा पाटील, विजय शुक्ल, धीरज राठोड, हेमंत कन्हैया तसेच बीएस्सी व एमएस्सी. इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.