सोयगाव तालुका शेतकरी सहकारी दूध संघाच्या चेअरमनपदी गोपीचंद जाधव; शिवदास राजपूत व्हाईस चेअरमन
सोयगाव, दत्तात्रय काटोले
सोयगाव, दि. 21 : सोयगाव तालुका शेतकरी सहकारी दूध संघाच्या चेअरमनपदी गोपीचंद गबरू जाधव तर व्हाईस चेअरमनपदी शिवदास लालचंद राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सहकार क्षेत्र हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून दूध संघाच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेऊन संस्थेची प्रगती साधावी, असे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांचा विश्वास कायम ठेवत दूध संघ अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
नवनिर्वाचित चेअरमन गोपीचंद जाधव व व्हाईस चेअरमन शिवदास राजपूत यांनी संघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही दिली. दूध संघाशी संबंधित शेतकरी व सभासदांच्या हिताला प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, शिवआप्पा चोपडे, धरमसिंग चव्हाण, कुणाल राजपूत, गणेश खैरे, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
























