पाचोरा शहरातील व तालुक्यातील नागरिकांना पोलीस प्रशासन तर्फ जाहीर आव्हान

पाचोरा शहरातील व तालुक्यातील नागरिकांना पोलीस प्रशासन तर्फ जाहीर आव्हान…

पाचोरा ( प्रतिनिधी संदीप तांबे )

पाचोरा शहरातील व परीसरातील नागरीकांना पोलीस प्रशासनाचे वतीने सूचित करण्यात येते. की मागील काही दिवसापासून व्हाट्सअप फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी किंवा चोर आले अशा प्रकारच्या अफवा फिरत आहे. अशा अफवा मुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून बहूरूपी, वाटसरु भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडलेले आहेत. त्यातून अशा जमावावर गंभीर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. सध्या पाचोरा शहरात व परीसरात अशा अफवा पसरविल्या जात असून लोकांचे मनात भिती पसरली असल्याचे निदर्शनास आले आहे.

पोलीस प्रशासनाच्या वतीने पाचोरा शहर व परीसरातील जनतेस आवाहन करण्यात येते की अफवावर विश्वास ठेवू नका: अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. जर कोणी अशा अफवा पसरवित असेल तर त्याचे नाव पोलीसांना कळवावे. बातमीची खात्री केल्या शिवाय सोशल मिडीयावर आलेला कोणताही मेसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करु नये.

सोशल मिडीयातुन आलेल्या मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवु नका अफवा पसरविणा-या तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलीसांचे लक्ष आहे अफवा पसरविल्यास आपणावर कडक कायदेशीर कारवाई केली. जाईल अफवेला बळी पडुन आपल्या हातुन गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांनी स्वता हुन कायदा हातात घेऊ नये कायदा व सुव्यावस्था आबाधीत राखण्यासाठी सहकार्य करावे. असे आव्हान पाचोरा पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी केले.