पाचोरा कृषी अधिकारी ए व्ही जाधव यांचे गुणवत्ता नियंत्रण व निविष्ठा व्यवस्थापन प्रशिक्षण पूर्ण

पाचोरा कृषी अधिकारी ए व्ही जाधव यांचे गुणवत्ता नियंत्रण व निविष्ठा व्यवस्थापन प्रशिक्षण पूर्ण

महाराष्ट्र शासन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मां) अंतर्गत वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था नागपूर येथे गुणवत्ता नियंत्रण व निविष्ठा व्यवस्थापन या विषयाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यात श्री ए व्ही जाधव कृषी अधिकारी पाचोरा यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. त्यांना पल्लवी तळमळे उपसंचालक नागपूर, सीमा मुंडके प्रशिक्षण समन्वयक वनमाती नागपूर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. श्री ए व्ही जाधव यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केल्याने पुढील कार्यकाळात आपले कार्यक्षेत्र असणाऱ्या भागातील शेतकर्यांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अवगत बाबींचा उपयोग करून देण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देईल अशाप्रकारचे मत व्यक्त केले. ए व्ही जाधव यांनी केलेल्या प्रशिक्षणाबद्दल त्यांचे सहकारी यू पी पाटील, आर पी पाटील, आर बी पाटील, श्री वारे, एस एम कचवे, श्री धनवडे, व्ही एस पाटील, श्रीमती ए एन जाधव यासह आप्तेष्ठांनी व मित्रपरिवाराने अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.