Home महाराष्ट्र सोयगाव तालुक्यात १६ शेतरस्ते मोकळे; शेकडो शेतकऱ्यांना दिलासा

सोयगाव तालुक्यात १६ शेतरस्ते मोकळे; शेकडो शेतकऱ्यांना दिलासा

सोयगाव तालुक्यात १६ शेतरस्ते मोकळे; शेकडो शेतकऱ्यांना दिलासा

 

 

 

सोयगाव, दत्तात्रय काटोले

सोयगाव दि .२१ (प्रतिनिधी ) : तहसीलदार मनिषा मेने यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली सोयगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये अतिक्रमण हटवून शेतरस्ते मोकळे करण्याची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत मोलखेडा, अनाड, वेताळवाडी, धनवट व जरंडी परिसरातील तब्बल १६ शेतरस्ते मोकळे करण्यात आल्याने शेकडो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

तहसील कार्यालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ५ अन्वये ही कारवाई करण्यात आली. मोलखेडा येथील गट क्रमांक ९७ मधील शेतरस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यास सुलभता निर्माण झाली आहे.

 

तसेच अनाड येथील गट क्रमांक १११ मधील शेतरस्ताही मोकळा करण्यात आला असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची वाहतूक व मशागतीची अडचण दूर झाली आहे. मोलखेडा परिसरातील गट क्रमांक १०७, १०८, १०४ व १०५ मधील रस्तेही खुल्या करण्यात आले.

 

१८ मे ते २८ मे दरम्यान तालुक्यातील विविध गावांमध्ये एकूण १६ शेतरस्ते मोकळे करण्यात आले असून सुमारे १०० ते १६० शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

या मोहिमेत मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल कर्मचारी व फरदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस बीट अंमलदार मिर्झा तडवी व गोपाळ साहेब हे हजर होते व ग्रामस्थांनी सहभाग घेतला. प्रशासनाच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Don`t copy text!