जो पक्ष सन्मानपूर्वक वागणूक देईल त्याच पक्षाला धनगर समाज पाठिंबा देईल: जगन्नाथ गावडेंचा इशारा !

जो पक्ष सन्मानपूर्वक वागणूक देईल त्याच पक्षाला धनगर समाज पाठिंबा देईल: जगन्नाथ गावडेंचा इशारा !

(सुनिल नजन चिफ ब्युरो अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) जो पक्ष भविष्यात धनगर समाजाला सन्मान पुर्वक वागनुक देईल त्याच पक्षाला धनगर समाज पाठिंबा देईल असा इशारा धनगर समाजाच्या वतीने शेवगाव तालुक्यातील नेते जगन्नाथ गावडे यांनी दिला .ते शेवगाव शहरातील धनगर गल्लीतील अहिल्यादेवी स्मारकात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजाच्या सर्व थरांतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत अध्यक्ष पदावरून बोलत होते.वर्षानुवर्षे प्रस्थापितांच्या सतरंज्या उचलून किती दिवस हुजरेगिरी करत बसायचे आता हे बंद करा आणि पुन्हा सतरंज्या उचलायच्या नाहीत. तर सन्मानाने जो धनगर समाजाला न्याय मिळवून देईल त्यालाच धनगर समाजाने मतदान करावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.या बैठकीस सर्व पक्षांतील धनगर समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.गेली सत्तर वर्षे प्रस्थापित पुढाऱ्यांनी धनगर समाजाचा फक्त मतांसाठी वापर करून घेतला.दर पाच वर्षाला निवडणूक आली की फक्त मतांसाठी या घराणेशाही चालवणाऱ्या नेत्यांना धनगर समाजाची आठवण होते.पण धनगर समाजाला ग्रामपंचायती पासून तर थेट खासदारकी पर्यंत राजकीय पक्ष उमेदवारी देत नाहीत. धनगर समाजाची राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी उघडपणे वापर करून घेउन नुसती अवहेलना केली आहे.जो पक्ष ग्रामपंचायत, नगरपालिका , सोसायटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकारी साखर कारखाने, खरेदी विक्री संघ, बाजार समिती,सरकारी कमिटीत धनगर समाजाला प्राधान्य देईल त्याच समाजाला धनगर समाजाने मतदान करावे.ही मोहीम सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यात राबविण्यात येणार आहे.निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत धनगर समाजासाठी काय काम केले याचा लेखाजोखा धनगर समाजाच्या बैठकीत त्यांनी जाहीर पणे मांडला पाहिजे.आता सर्व पक्षांचे पदाधिकारी मतांचा जोगवा मागत धनगर समाजाची दारे ठोठावत आहेत.पण सत्तेवर निवडून गेले की या प्रस्थापित घराण्यांना धनगर समाजाचा विसर पडतो.राज्यातील सर्वच पक्षांनी धनगर समाजाची अवहेलना करून फसवणूक केली आहे.जे धनगर समाजाच्या नावावर नेते झाले त्यांनी फक्त आपली स्वतःची घरं भरली.आणि समाजाला वाऱ्यावर सोडले आहे.ताई माई अक्का, दादा,भाउ, भैय्या यांना त्यांची जागा दाखवन्याची वेळ आली आहे.जिल्ह्यातील आमदार, खासदार, यांनी धनगर समाजाला फक्त प्रलोभने दाखवून झुलवत ठेवले आहे.फक्त सरकार कडून नुसत्या फाजील आश्वासना व्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. आतापर्यंत धनगर समाजाच्या दलालांनी धनगर समाजाला वेगवेगळ्या पक्षांच्या दावणीला बांधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.स्वत:ला नेते म्हणून घेणारे लोकसभेत आणि विधानसभेत मुग गिळून गप्प बसतात.आणि धनगर समाजाला वाऱ्यावर सोडतात.ही धनगर समाजाची आजपर्यंतची खरी शोकांतिका आहे.अहिल्यादेवीचे नाव अहमदनगर जिल्ह्याला द्यावे या साठी संपूर्ण जिल्ह्यात धनगर समाजाच्या वतीने रथयात्रा काढण्यात आली होती.जिल्ह्यातील किती खासदार आणि आमदार यांनी धनगर समाजाला मदत केली हे जाहीर सभेतून सांगितले पाहिजे.या प्रस्थापितांनी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना देशोधडीला लावण्याचेच महापाप केले आहे.त्याचा जाब विचारण्याची नामी संधी आता आली आहे.सर्व जिल्ह्यातील धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक व्हा आणि धनगर समाजाची ताकद दाखवून द्या असे सर्व पक्षांतील धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे सांगितले.या शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील दोन्ही तालुक्यातील अनेक गावांतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाचे नगरसेवक गणेश कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेवगाव बाजार समितीचे उपसभापती सभापती गणेश खंबरे, नगर सेवक भाऊसाहेब कोल्हे,रासपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष अंकुश बोके,विजय नजन, राजेंद्र शिंदे,यश गाढे, एकनाथ आदमने, गणेश क्षिरसागर, शिवाजी तोतरे,लक्ष्मण भिसे, सोन्याबापू गिरगुणे, अंकुश गाढे, कैलास गाढे, विक्रम गाढे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अशोक चोरमले, यांच्या सह अनेक गावांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.विनायक नजन सर यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.संपुर्ण जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर बैठका घेण्यात येणार आहे.आणी लोकसभेच्या निवडणुकीत नेमका कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा हे भर सभेत जाहीर करण्यात येणार आहे.धनगर समाजाने आता एकी दाखवली पाहिजे.