सोयगाव : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त भव्य सक्षमीकरण मेळावा; सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे यांचा गौरव

सोयगाव : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त भव्य सक्षमीकरण मेळावा; सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे यांचा गौरव

 

 

सोयगाव, दि. ३ (प्रतिनिधी) – जागतिक दिव्यांग दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्यमंदिरात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीने सक्षमीकरण व मार्गदर्शन मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब अरावत, तसेच प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे व दादासाहेब पाचपुते आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

 

मेळाव्यात दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संस्था व व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. सोयगावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे यांच्या प्रेरणादायी आणि सातत्यपूर्ण कार्याचा गौरव करत त्यांना सपत्नीक पुरस्कार प्रदान करण्यात आला. “हा सन्मान माझ्या आई, पत्नी आणि सहकाऱ्यांचा आहे. पुढील सेवाकार्यासाठी हा पुरस्कार नवऊर्जा देणारा आहे,” अशी प्रतिक्रिया संदीप इंगळे यांनी व्यक्त केली.

 

या सक्षमीकरण मेळाव्यामुळे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना नव्या संधी, प्रेरणा आणि आत्मविश्वासाची दिशा लाभल्याचे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत अनेक मान्यवरांनी मांडले.

 

संदीप इंगळे यांच्या सन्मानाबद्दल अमोल निकम, क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्थेचे उपाध्यक्ष ईश्वर इंगळे, सचिव दिलीप शिंदे, दत्तू रोकडे, ज्ञानेश्वर गाडेकर, शाम पाटील, महेश मानकर, राम सोहनी, दिलीप सुरडकर, अशोक ढगे, अनिल लोखंडे, तुकाराम सोनवणे, दत्तात्रय काटोले, राम फुसे, राहुल सोनवणे, भगवान कोथलकर, हरीश पाटील, गणेश कापरे, अनिल ठाकरे, गजानन बडक आदींनी अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.