पाचोऱ्यात भव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न

पाचोऱ्यात भव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न

पाचोरा:- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज पाचोरा येथे पुनगावचे माजी उपसरपंच भैय्या मोरे, बांबरुड महादेवाचे राजीव नामदेव पाटील (निवृत्त शिक्षक), पिंपरी खू. प्र. पा. येथील संदीप शांताराम शिंपी व निलेश विनायक पाटील सामनेर चे अनिल शांताराम पवार, सचिन युवराज भिल, सुनील शांताराम भील, समाधान संजय भिल, ज्ञानेश्वर प्रकाश भिल, मनोज बुधा भिल, प्रवीण जंगलू देविदास बसंत भिल सुपडू भागवत भील, संदीप विजय, संजय भिल, यांनी पक्ष प्रवेश केला. आज दिनांक 23-08-2023 रोजी दुपारी 02:00 वा. शिवसेनेच्या नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. ताईसो. यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना पक्ष संघटन तसेच पक्ष मजबुतीसाठी आपणा सर्वांना खूप मनापासून मेहनत घ्यावयाची आहे व माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात बळकट करून विजयाचा झेंडा रोवायचा आहे असे नमूद केले.
याप्रसंगी उद्धव मराठे उपजिल्हाप्रमुख, रमेश बाफनाजी शेतकरी नेते, अरुण पाटील शेतकरी सेना जिल्हाप्रमुख, शरद पाटील तालुकाप्रमुख, राजेंद्र पाटील माजी झेड.पी. सदस्य, अनिल सावंत शहर प्रमुख, दादाभाऊ चौधरी माजी नगरसेवक, शशी पाटील युवा सेना तालुकाप्रमुख, मनोज चौधरी शहर प्रमुख युवासेना, अभिषेक खंडेलवाल, संजय चौधरी, खंडू भाऊ सोनवणे, अजय पाटील, पप्पू जाधव, मंदाकिनी पारोचे, जयश्री येवले, अनिता पाटील, कुंदन पंड्या, आणि शिवसेना युवासेना महिला आघाडी यांचे पदाधिकारी व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.