नांद्रा परिसरात गेल्या चार महिन्यात रस्त्यालगत असलेल्या घरा समोरून पशुधन व इतर चोरीत वाढ

नांद्रा परिसरात गेल्या चार महिन्यात रस्त्यालगत असलेल्या घरा समोरून पशुधन व इतर चोरीत वाढ

नांद्रातापाचोरा(वार्ताहर ) येथील पाचोरा जळगाव हायवेला गावा लगत रहिवास असलेले गुलाब भास्कर बाविस्कर यांच्या घरा जवळून दूध देणारी गाय काल दिनांक 1जानेवारी ला मध्ये रात्री खुंट्याचा दोर कापून चोरून नेलीआहे,दोन महिन्या पूर्वी तेतुनच त्यांची दोन वासंर अशीच चोरली आहेत त्यामुळे रस्ता लगत असणारे पशुपालक व इतर व्यवसायकी पण भयभीत झाले आहेत व या अगोदर ही सुरेश शामराव पाटील यांचे नांद्रा पेट्रोल पंपाजवळचे रस्त्यावर चे दुकान फोडणे,तेतेच बोकड चोरणे, शेतातिल पाण्याची मोटारी चोरने अशा भुरट्या व सराईत चोऱ्या झाल्या असून या चोरांचा उपद्रव आत्ता जास्त वाढला असून पोलीस विभागातर्फे अशा या चोरटांच्या मुसक्या आवळणे आत्ता चॅलेंज झाले आहे.आज गुलाब बाविस्कर याच्या घरातील सर्व दुग्ध देणारे जनावरे या चोरट्यनी लांबावाल्यामुळे आज त्यांच्या कुटुंबवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरी रस्त्याच्या बाजूला लागून असेलेलं घरमालक,पशुपालक यामुळे भयभीत झाले असून यापुढे ही काही अनुचित मोठीं घटना घडू नये म्हणून या भुरट्या व सराईत चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नांद्रा परिसरातील शेतकरी बांधव,पशुपालक व ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात येत आहे