श्री गो.से.हायस्कुल येथे सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न

श्री गो.से.हायस्कुल येथे सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न

पाचोरा येथील श्री.गो.से. हायस्कुल व युनिक कॉम्प्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.6 डिसेंबर रोजी सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न झाली.
याप्रसंगी धुळे येथील सिद्धेश कॉम्प्युटरचे संचालक श्री. संतोष बिरारी व पाचोरा पोलीस स्टेशनचे PSI श्री. योगेश गणगे साहेब उपस्थित होते. श्री. संतोष बिरारी यांनी शालेय विद्यार्थ्यांना मोबाईल, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून आर्थिक व इतर फसवणूक कशी केली जाते याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री.योगेश गणगे साहेब यांनी शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईल व सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा असे मत प्रतिपादन केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ यांनी शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईलचा कमीत कमी वापर करून चांगले करिअर घडवावे याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी युनिक कम्प्युटरचे संचालक श्री.स्वप्निल ठाकरे, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. आर.एल.पाटील, श्री.एम.टी. कौंडिण्य व इतर शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. आर.बी.तडवी यांनी तर आभार प्रदर्शन श्री.डी.डी. कुमावत यांनी केले.