नाँद्रा येथे सततधार पाऊसामुळे मातीचे घर कोसळले,शेतीही नष्ट

नाँद्रा येथे सततधार पाऊसामुळे मातीचे घर कोसळले,शेतीही नष्ट

नाँद्रा ता.पाचोरा(वार्ताहार) येथे गेल्या दोन दिवसापासून सततधार पाऊस चालूच आहे व काल दि.22 सप्टेंबर पासून मध्य राञी पासून तर पाऊसाचा जोर खूपच वाढला व याच सततधार पाऊसामुळे बोरसे गल्लीतील भास्कर ञ्यबंक बाविस्कर यांच्या मालकीचे असलेले मातीचे घर सततधार पावसाचे पाणी मुरून संपूर्ण कोसळले सुदैवाने त्यात कोणी राहत नव्हते म्हणून जिवीत हाणी झाली नाही परंतु त्यामध्ये घरातील जिवनाश्यक वस्तू ,भांडे,पाण्याच्या टाकी ,अन्न धान्य ,शेतीचे अवजारे व इतर संसारोपयोगी वस्तू दबल्याने मोठे प्रमाणात नूकसान झालै असून पडलेल्या घराचा पंचनामा होऊन उचित भरपाई मिळण्याची मागणी गुलाब भास्कर बाविस्कर यांनी केली आहै.गेल्या दोन दिवासापासून नांद्रा परिसरात अतिवृष्टी होत असून माणसाबरोबरच गुरे ढोर यांची ही सततधार पाऊसामुळे यातायात होत आहे व गुराढोरानवर ही साथीचे आजार येत आहे. शेतीचे येणारे उत्पन्न ही आता हिरावले गेले आहे कापूस पिवळा पडतै आहे,कैर्या सडत आहेत,सोयाबीन आडवा पडून शेंगा सडात आहेत,मक्का,ज्वारी व इतर पिके नेस्तनाबूत होऊन सडत आहेत.शासनाच्या निकषाप्रमाणे ६०एमएम च्या वर पावसाची नोंद झाली तर अतिवृष्टी ग्राह्य धरली जाते.तरी पर्जन्यमान मापनयंञाचे अहवाल घेऊन सरसकट ओला दृष्काळ दाखल करावा अशी मागणी नांद्रा सह परिसरातील खेड्यातील शेतकरी वर्गातून व पशुपालक व ग्रामस्थ यांच्यातून होत आहे.