पाचोरा शहरातील संवेदनशील भागात रॅपिड ऍक्शन फोर्स व पोलीस स्टेशन स्टाफ यांचा रूट मार्च

पाचोरा शहरातील संवेदनशील भागात रॅपिड ऍक्शन फोर्स व पोलीस स्टेशन स्टाफ यांचा रूट मार्च.

पाचोरा.दिनांक ३०/०७/२०२१
रोजी १०:३०ते ११:३०वाजे दरम्यान पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीतील संवेदनशील भागातून रॅपिड ऍक्शन फोर्स व पाचोरा पोलीस स्टेशन स्टॉफ तर्फे रूट मार्च उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. भारत काकडे, तसेच रॅपिड ऍक्शन फोर्स कंपनीचे रवी शेखावत कमांडंट यांचे उपस्थितीत घेण्यात आला.
सदर रुट मार्च पाचोरा पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन शहरातील संवेदनशील भागातील नगरपालिका , हुसैनी चौक, मच्छी बाजार, आठवडे बाजार, रथ गल्ली, मुल्ला वाडा, छत्रपती शिवाजी महाराज चौक व शेवटी पोलीस स्टेशन येथे संपविण्यात आला. सदर रूट मार्च मध्ये रॅपिड ऍक्शन फोर्स चे १ पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उपनिरीक्षक एकूण ५० कर्मचारी तसेच, पाचोरा पोलीस स्टेशन चे १ पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक व १५ पोलीस कर्मचारी यांचा सहभाग होता.