आसनखेडा जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना वाटरबॅगचे वाटप

आसनखेडा जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना वाटरबॅगचे वाटप

नांद्रा (ता.पाचोरा)ता.१८ जि.प.प्राथमिक शाळा आसनखेडे येथे कै.धनुबाई कृष्णराव बोरसे पुण्यस्मरणा निमिंत्त शालेय विद्यार्थ्यांना वाटर बॅग व पेन्सिल पाऊच श्री.प्रभाकर कृष्णराव पाटील (बोरसे) आणि घनश्याम प्रभाकर पाटील यांच्या तर्फे वाटप करण्यात आले.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विरेंद्र पाटील, सदस्य सुदर्शन पाटील, मुख्याध्यापक श्री. दिलीप पाटील सरांनी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानले. यावेळी शितल सोनवणे, दिपाली डाळवाले, ज्योती चौधरी,पुनम बागुल उपस्थित होते.
फोटो ओळ…….
आसनखेडा (ता.पाचोरा) येथील जि.प.शाळेत कै.धनुबाई बोरसे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विद्यार्थ्यांना वाटर बॅग व पेंन्शील पाउचचे वाटप करतांना प्रभाकर पाटील मुख्याध्यापक दिलीप पाटील आदी.