वडाळा-वडाळी येथे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

वडाळा-वडाळी येथे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

आज वडाळा -वडाळी येथे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल&डॉ.भूषण मगर पाटील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रामस्थ मंडळी वडाळा-वडाळी यांच्या सहकार्याने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ भूषणदादा मगर,डॉ.सोहेल शेख सह विघ्नहर्ता हाॅस्पिटल टीम उपस्थित होते.

तसेच देशाच्या रक्षणार्थ शहीद झालेले जवान शहीद सोपान आमले,शहीद गणेश अहिरराव यांच्या पुतळ्यास माल्यार्पण विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ भूषण मगर-पाटील यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

आरोग्य शिबीर कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, गावातील तरुण मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.