दिवाळी आणि आयुर्वेद_《आहार विहार आणि घ्यावयाची काळजी

🪔 ❀ °°दिवाळी आणि आयुर्वेद°°❀ 🪔
_《आहार विहार आणि घ्यावयाची काळजी》_

पहाटे लवकर उठून शरिराला तेलाचा _अभ्यंग_ केल्यावर जाणवणारी कडकडीत थंडीत उटण्याच्या सुगंधात केलेली गरम पाण्याची अंघोळ आणि आंघोळीनंतर घरातल्या सर्वांनी एकत्र बसून केलेला फराळ होय. दिवाळीतल्या या दिनचर्येचे वर्णन आयुर्वेदात सुद्धा आहे व त्यामुळेच आपण आयुर्वेदमय दिवाळी साजरी करूया.
{•}_हेमंत ऋतू आणि आहार आयुर्वेद_❄️☞
आयुर्वेद शास्त्रामध्ये ऋतूनुसार आपला आहार विहार कसा असावा ,काय करावे काय करू नये ,यासंबंधी सखोल वर्णन आचार्यांनी करून ठेवलेला आहे. *_हेमंत,शिशिर,वसंत,ग्रीष्म,शरद_* हे सहा ऋतू आपल्याकडे आहेत .त्याचे सविस्तर वर्णन शास्त्रामध्ये आहे .यापैकी हेमंत ऋतू हा थंड ऋतू आहे व दिवाळी ही हेमंत ऋतूमध्ये म्हणजेच दिवाळीने हेमंत ऋतूची सुरुवात होते व जो नितीनियम आपण दिवाळीला करत असतो तो तसाच पुढे पूर्ण हिवाळाभर करावा असा याचा अर्थ आहे. भारतात हेमंत व शिशिर हे हिवाळ्यातील ऋतू आहेत आपल्या भागात या काळात खूप जास्त प्रमाणात तापमानात घट होते व बोचरी अशी थंडी जाणवायला सुरुवात होते .हेमंत ऋतूची सुरुवात दिवाळीपासून होते हळूहळू आपल्या पचनशक्तीला बळ प्राप्त व्हायला लागते व भूक वाढीस सुरुवात होते ,या काळात म्हणजे दिवाळी आली की शरीराला बलदायक उष्ण अशा पदार्थांचे सेवन करायला हवे ,जसे आपण दिवाळीला फराळ करतोच लाडू, दुधाचे पदार्थ, करंज्या ,गुलाब जामुन ,मेथीचे लाडू ,मिठाई शंकरपाळे, इत्यादी या काळात थंडी वाढल्यामुळे हवा कोरडी होते व त्वचेला कोरडेपणा येतो व त्वचेच्या ठिकाणी खाज यायला सुरुवात होते. ओठ फाटणे, टाचेला भेगा पडणे, त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर उद्धवतात .त्याचप्रमाणे डोक्यात कोंडा होणे ,केस गळणे या काळात खूप जास्त प्रमाणात वाढते हे होते .
थंड वातावरणामुळे वात वाढतो व वातामुळे हा सगळा त्रास होतो. मग आता या वाताला कमी करायचे कसे, ते पाहू …स्निग्ध उष्ण आहार आपण फक्त दिवाळीत घेतो तो आपण पुढे चार महिने तसेच सुरू ठेवला तर, आपल्या शरीरावर उद्भवणाऱ्या वाताच्या त्रासापासून सुटकारा मिळेल .भारतीय शास्त्रामध्ये प्रत्येक सणाला महत्त्व आहे व प्रत्येक ऋतू बदलाच्या वेळी विशिष्ट साजरे केले जातात व त्या सणाला आपण ज्या पद्धतीने आहार घेतो तो तसाच पुढे तो ऋतू संपेपर्यंत असावा असा त्याचा अर्थ शास्त्राला अणुसरून आहे .पिढ्यानपिढ्या
आपण तो फॉलो करत आहोत, संस्कृती जपत आहोत ,दिवाळीला आपण अभ्यंग स्नान करतो, उटने लावतो हे फक्त तेव्हाच करावे, असे नाही.. आयुर्वेदामध्ये यासाठी विशेष उल्लेख आहे .
_अभ्यङ्गमाचरेन्नित्यं स जराश्रमवातहा । दृष्टिप्रसादपुष्ट्यायुः स्वप्नसुत्वक्त्वदार्ढ्यकृत् ॥_(श्री वाग्भट संहिता)_
{•}_《°°अभ्यंग°°》☞_
म्हणजे पूर्ण शरिराला तेल लावणे, तेलाच्या स्निग्धतेमुळे,तेलाच्या उष्ण गुणांनी त्वचेचा कोरडेपणा ,रुक्षता लगेच कमी होते .व त्वचेचा प्राकृत तेज त्या ठिकाणी अभ्यंगामुळे यायला लागतो. त्वचेवरचा वात व शरिरातील कफ कमी करण्यासाठी तेलाने अभ्यंग अवश्य करावा अभ्यंगामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते, शरीर धष्ट पुष्ट होते, झोप चांगली येते व त्वचा दृढ होऊन त्या ठिकाणी त्वचेचे आरोग्य राखायला मदत होते त्वचा अजूनच कांतीमान होते.

•|| शिरःश्रवणपादेषु तं विशेषेण शीलयेत् ||•_
आता एवढ्या दगदगीच्या जीवनात कोणाला एवढा वेळ आहे ,पूर्ण शरिराला तेल लावून अभ्यंग करतील… त्यासाठी आचार्यांनी पुन्हा वर्णन केले की शिरप्रदेश म्हणजेच डोके, कान व तळहात, तळपाय यांचे विशेषत्वाने अभ्यंग करायलाच हवे म्हणजे रोज या ठिकाणी तेल लावणे अभ्यंग करणे गरजेचे आहे हिवाळ्यात रोज अभ्यंग करावा इतर ऋतूत् किमान आठवड्यातून एक वेळा तरी सर्व शरीराला तेल लावून अभ्यंग नक्की करावा.

{•}《°°उद्वर्तन /उबतन उटणे°°》☞

_उद्धर्तनं कफहर मेदसः प्रविलायनम्।_
_स्थिरीकरणमङ्गानां त्वक्प्रसादकर परम्॥_
_(श्री वाग्भट संहिता)_
उटणे लावणे म्हणजे काय तर औषधी चूर्ण तेल लावून झाल्यावर शरिरावर लावणे व घासणे हे नियमीत करण्यासाठी आचार्यांनी शास्त्रामध्ये वर्णन करून ठेवले आहे.औषधीयुक्त उटणे लावून जर आपण आंघोळ केली तर विषारी द्रव्ययुक्त साबणाची गरज भासत नाही, त्वचा कोमल होते त्वचेचे रोग बरे होतात, अथवा त्यापासून आपण दूर राहतो उद्वर्तणामुळे कफाचे शमण होते, शरिरातील चरबी कमी होते ,शरीर पुष्ट होते, त्वचेचे रोमरंध्र खुले होतात व त्वचेचे पोषण सुरळीत होऊ लागते, शरीर पुष्ट होते , सुआकार शरीराला प्राप्त होतो, त्वचा कांतीमान, होते वाढलेले वजन कमी होते व ज्यांचे वजन कमी आहे त्यांचे वजन वाढण्यास या अभ्यंग व उद्वर्तणाने मदत होते.

*{•} 《°°°व्यायाम°°°》_ 🏋️
_लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोऽग्निर्मेदसः क्षयः|_
_विभक्तघनगात्रत्वं व्यायामादुपजायते||१०||_

व्यायाम आपण जो काही गुरु उष्ण स्निग्ध असा आहार दिवाळीला घेतो तो पचण्यासाठी त्या आहाराचे पचण होऊन त्याने शरीराचे धारण कार्य होते त्यासाठी व्यायाम नक्की करावा.
व्यायामामुळे शरीराला हल्केपणा येतो, काम करण्याची इच्छाशक्ति वाढते,जाठराग्नि (digestive fire) वाढतो,शरीर रुबाबदार व सुडौल होते,चरबी कमी होते.
व्यायाम सुद्धा हिवाळ्यात जास्त करण्यास सांगितला आहे. इतर ऋतूत कमी व हिवाळ्यात जास्त प्रमाणात व्यायाम करायला हवा, त्यामुळे शरीराचे स्वास्थ टिकून राहण्यास मदत होते.

अशा पद्धतीने जर आपण दिवाळीचे आयुर्वेदातील वर्णन व दिवाळी आणि आयुर्वेद असा संबंध समजून घेतला तर निरोगी राहण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल.
अभ्यंग, उद्वर्तन , स्वेदन हे पंचकर्मातील प्रक्रिया आहेत् ते आपल्याला घरी करता येत नसेल किंवा त्याबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्हाला अथवा जवळच्या पंचकर्म सेंटरला अवश्य भेट द्या अथवा संपर्क करा
🙏 _•|| धन्यवाद ||•_ 🙏
आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔✨

वैद्य योगेश तेली_(पा.नाडी वैद्य)_
वैद्य महिमा तेली _(आयुर्वेद वाचस्पती स्कॉ.)_

दीर्घायु सुपरस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म सेंटर
✉ _प्रताप नगर जळगाव_
मोबाईल नंबर ☞ 9860487198