श्री सु.भा पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती साजरी

पाचोरा तालुका शिक्षण संस्थेने चालवलेल्या श्री सुभा पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्य इमारत सकाळ सत्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती सीमा भदाणे मॅडम यांनी भूषवले व सूत्रसंचालन श्रीमती वर्षा पाटील मॅडम यांनी केले तसेच श्रीमती उज्वला साळुंखे मॅडम व श्रीमती वर्षा पाटील मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक परदेशी सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी देखील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपली मनोगते व्यक्त केली तसेच शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री रविंद्र महाले सर यांनी केले अशा पद्धतीने कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला