‘वैशालीताई तुम आगे बढो’च्या जयघोषाने दुमदुमला भडगाव तालुका

वैशालीताई तुम आगे बढो’च्या जयघोषाने दुमदुमला भडगाव तालुका

शाखा उदघाटनाच्या कार्यक्रमांना तरूणाईसह महिला व ज्येष्ठांचा हिरीरीने सहभाग

भडगाव, दिनांक १४ (प्रतिनिधी ) : ‘गाव तिथे शाखा’ अभियानाच्या अंतर्गत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते आज भडगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये पक्षाच्या शाखांचा शुभारंभ करण्यात आला असता त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यात तरूणाईसह महिला आणि ज्येष्ठांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला.

या संदर्भातील माहिती अशी की, आज सकाळी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते भडगाव तालुक्यातील वलवाडी, महिंदळे, रूपनगर, पळासखेडा, नालबंदी, वडजी, पांढरद, पिचर्डे, बात्सर, शिवणी आदी गावांमध्ये शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखांचे उदघाटन करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. साधारणपणे शिवसेनेची शाखा म्हटल्यावर तेथे तरूणाई असेल हे निश्‍चित असते. या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात तरूणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. तर याच्या जोडीला महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती देखील लक्षणीय होती. यात बर्‍याच शाखांचे उदघाटन हे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी ठिकठिकाणी वैशालीताई सुर्यवंशी यांनी उपस्थितांशी संवाद साधतांना शिवसेना शाखांच्या माध्यमातून स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सर्वसामान्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करतील अशी उपस्थितांना ग्वाही दिली. याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सोबत दिपक पाटील, शंकर मारवाड़ी, जे के पाटील, गोरख दादा, विजय साळूखे, पप्पु दादा , रतन दादा, नवल परदेशी, भुषन पाटील, मनीषा पाटिल, योजना ताई, भाऊसाहेब पाटील, मनोहर चौधरी, रीतेश सोनवणे, मछिंद्र आबा, शरद पाटील, अशोक बापू, चेतन पाटील, सुरेश पाटिल, भास्कर भाऊ या मान्यवरांची उपस्थिती होती.