जलगांव शहर पिंप्राळा हुडको मनपा ऊर्दु शाळा क्रमांक 19 येथे ईद मिलादुन्नबी (स.अ.व.) निमित्त नात व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
आज शाळेत ईद मिलादुन्नबी (स.अ.व.) मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी नात वाचन आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला
स्पर्धेची सुरुवात कुरआन शरीफच्या तिलावतने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अमजदभाई रंगरेज होते त्यानंतर विद्यार्थ्यांनी नात आणि भाषणांद्वारे हजरत मुहम्मद पैगंबर (स.अ.व.) यांचे चरित्र नैतिकता आणि शिक्षण याविषयी आपले विचार मांडले या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये श्रद्धा, प्रेम, नैतिक मूल्ये निर्माण करणे हा होता, जेणेकरून ते आपले व्यक्तिमत्त्व सुधारतील आणि समाजात सकारात्मक बदल घडवतील या वेळी शिक्षकांनीही भाषण करताना सांगितले की, पैगंबर मोहम्मद (स.अ.व.) यांचे शिक्षण हे मानवतेसाठी मार्गदर्शक आहे आणि आपण त्यांचे अनुकरण केले पाहिजे
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांच्या यश आणि समृद्धीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली यावळी शिक्षक अबजलसर,शगुफ्ता मैडम, शाकीपसर,नाजिमसर,फरानसर,वसिमसर, व पालकवग मोट्या सख्येने उपस्थित होते.