रवींद्र मोहन परदेशी यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल उदयोन्मुख नेतृत्व (इमर्जिंग लीडरशिप) पुरस्कार
जगातील इन्शुरन्स क्षेत्रातील नामांकित कंपनींपैकी निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कं. तर्फे प्रदेश व्यवस्थापक रवींद्र मोहन परदेशी यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल उदयोन्मुख नेतृत्व (इमर्जिंग लीडरशिप) पुरस्कार व प्रतिष्ठित मानली जाणारी नवरत्न पदवी दिवार आयर्लंड, गोवा येथे दि. ९ सप्टेंबर रोजी देण्यात आली. परदेशी यांनी यासाठी सर्व श्रेय कुटूंब, मित्र, नातेवाईक आणि सर्व ग्राहकांना दिले. यावेळी त्यांनी ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते असे सांगितले. तसेच पुढे जाण्यासाठी दोन्ही पुरस्कार खूप महत्वाचे आहेत. आपले प्रेम, विश्वास आणि आशीर्वादांबद्दल मनापासून आभार मानले. या दोन्ही पुरस्कारांबद्दल मित्र परिवार व सहकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या…!