दशक्रियेला जर पुर्वेकडून कावळा आला तर मनुष्य वैकुंठाला,पश्चिमेकडून आला तर स्वर्गाला, दक्षिणेकडून आला तर नरकाला,आणि उत्तरेकडून आला तर कैलासाला : ह.भ.प. अक्षय महाराज उगले
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) प्रत्येक दशक्रिया विधीच्या वेळी जर कावळा पुर्व दिशेकडून आला आणि पिंडाला शिवला तर मयत झालेला मनुष्य वैकुंठाला गेला, जर तोच कावळा पश्चिम दिशेकडून आला आणि पिंडाला शिवला तर तो मयत मनुष्य स्वर्गाला गेला,जर तोच कावळा दक्षिण दिशेकडून आला आणि पिंडाला शिवला तर तो मयत मनुष्य नरकाला गेला,आणि तोच कावळा उत्तर दिशेकडून आला आणि पिंडाला शिवला तर मयत मनुष्य हा कैलासाला गेला असे समजावे अशी माहिती नेवासा तालुक्यातील जेऊर हैबतीचे रहीवाशी असलेले आणि पारनेर तालुक्यात निवासी असलेले ह.भ.प. अक्षय महाराज उगले यांनी दिली.ते अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे स्वर्गवासी केरुबापू पाटील शंकरराव राजळे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त आयोजित केलेल्या प्रवचनात संदेश देताना बोलत होते.केरूबापू पाटील राजळे यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी आपला देह ठेवला होता.त्यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन त्यांचे मंत्रालयात मोठे अधिकारी असलेले आणि गावाचे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब राजळे आणि संभाजीनगरचे प्रसिद्ध उद्योजक शामसुंदर राजळे व त्यांच्या सुनबाई सौ. शारदाताई राजळे आणि सौ.शालिनीताई राजळे यांनी केले होते. त्या वेळी ह.भ.प. उगले महाराज यांनी रामायण, महाभारतातील अनेक दाखले देऊन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध आणि भावना विवश केले होते.तसेच मुलगी सासरी जाताना बापाची होणारी अवस्था,भाउ आणि बहिणीत संपत्तीच्या वादातून होणारा कलह,भावा भावात जमिनीच्या तुकड्या वरून होणारी भांडणे या सर्व प्रकारच्या गोष्टींना स्पर्श करीत उपस्थित श्रोत्यांना या वादावर पडदा टाकून एकोपा निर्माण करण्यासाठीचे भावनिक आवाहन त्यांनी केले. माणसाचे जीवन हे क्षणभंगुर आहे.प्रत्येकाने उगाचच कोणाशीही वैरभाव न ठेवता आनंदाने जीवन जगण्यासाठी रोज आपल्या ग्रामदेवता, कुलदेवता,पित्रूदेवता व भगवंताचे स्मरण करून आपले विचार बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच प्रत्येकाने आपल्या जिवंत असलेल्या आई बाबांची सेवा तर करावीच पण देशाच्या सिमेवर लढणाऱ्या सैनिकांचा आदर करुन त्यांच्या विषयी क्रुतज्ञता बाळगावी असेही सांगितले.उपस्थितांना भाऊंच्या आठवणी सांगताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. स्वर्गवासी केरुबापू पाटील राजळे यांना गावातील सर्व लहान थोर मंडळी “भाउ” या नावाने संबोधत असत. काही वर्षांपूर्वी ते गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष ही होते.त्या काळात ते गावातील अनेक लहान मोठे तंटे सोडवत असत.म्हणून गावाने त्यांना पाटीलकी बहाल केली होती.मग ते “केरुबापू पाटील राजळे” या नावाने सर्वत्र ओळखले जाउ लागले.त्यांना संपूर्ण आयुष्यभर साथ देणाऱ्या त्यांच्या पाटलीणबाई पत्नी सौ.वत्सलाबाई केरुबापू राजळे यांच काही दिवसांपूर्वी निधन झाले होते त्यामुळे ते अत्यंत पोरके झाले होते.त्यांना दोनच मुले आहेत मुलगी नाही म्हणून त्यांनी त्या काळात दुसऱ्याच्या मुलीचे आपल्या दारात मांडव घालून लग्न करून दिले होते.असं लाडक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले म्हणून गावातील अनेक सामाजिक कार्यकर्ते हळहळ व्यक्त करीत त्यांची आजही आठवण काढत आहेत. ह.भ.प. अक्षय महाराज उगले यांनी पाटलांच्या सर्व स्मृती जाग्या केल्यामुळे अनेकांना अश्रू अनावर होत गहिवरून आले होते.शासनाचा आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार मिळालेल्या स्व.पाटलांना यावेळी रामदास म्हस्के सर, गावच्या सरपंच सौ मोनालीताई राजळे,आव्हाण्याचे नेते अंबादास कळमकर, डॉक्टर काकडे,तुंबारे साहेब, वैभवराव आंधळे, शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,आणि पाटलांच्या सुनबाई सौ. शारदाताई राजळे यांनी श्रद्धांजलीपर दोन शब्दांची सुमनांजली अर्पण केली.याप्रसंगी जवखेडेचे लोकनियुक्त सरपंच चारूदत वाघ, ॲडव्होकेट गुलाबराव राजळे,औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मा.सिनेट सदस्य भाऊसाहेब राजळे,आदिनाथ नागरी पतसंस्थेचे चेअरमन अर्जुनराव राजळे, वाघोलीचे शेळके गुरुजी, एकनाथ राजळे,संभाजी राजळे, डॉ. हाडके,भाउपाटील राजळे,म्हातारदेव शेळके,राधाकिसन राजळे,अप्पासाहेब राजळे,सोपानराव तुपे,शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा योगिता राजळे,नानासाहेब देशमुख,दत्तात्रय महाराज राजळे, शिवाजी म्हस्के, विनायक म्हस्के, कैलास भगत,नामदेव नाना राजळे, बाबासाहेब राउत, माणिक राजळे, डॉ मुकुंद राजळे, डॉ अनिल भगत,यांच्यासह पाटलांचे जुन्या काळातील अनेक सहकारी उपस्थित होते. पसायदाना नंतर प्रितीभोजनाने या सोहळ्याची सांगता झाली.

























