पाचोऱ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा प्रविण दरेकर यांचा जाहीर निषेध!!

पाचोऱ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा प्रविण दरेकर यांचा जाहीर निषेध!!

पाचोरा (प्रतिनिधी ) भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना राष्ट्रवादीमधील महिलांच्या प्रवेशा बाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.गरीबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज पाचोऱ्यात छत्रपती शिवाजी चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून जाहीर निषेध करण्यात आला तसेच यावेळी दरेकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
प्रविण दरेकर यांनी शिरूर इथे राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंती निमित्त जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला हे वादग्रस्त वक्तव्य केलं. दरेकरांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेताना चाकणकर यांनी राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे पाचोरा-भडगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात जोडेमारा आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष वंदनाताई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील सर तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे शहरातील सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनावेळी ‘प्रविण दरेकरांचा निषेध करून ‘दरेकरांचा धिक्कार असो. अशा घोषणा देण्यात आल्या.