पाचोरा तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार माजी आ.दिलीप वाघ यांच्या हस्ते

पाचोरा तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार
माजी आ.दिलीप वाघ यांनी केलेला सत्कार

पाचोरा (प्रतिनिधी) दिनांक 21 मार्च 2022 रोजी संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली चेअरमन पदासाठी श्री एकनाथ रतन तावडे व्हाईस चेअरमन पदासाठी श्री मुकेश अग्रवाल या दोघांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी श्री व्हि एम जगताप यांनी चेअरमन पदी श्री एकनाथ रतन तावडे तर व्हाईस चेअरमनपदी श्री मुकेश अग्रवाल यांची बिनविरोध निवड घोषित केली या संस्थेच्या निवडणुकीत श्री पुनमचंद रामानंद मोर डी एम पाटील सचिन कोठावदे उमेश राका रवींद्र देवरे हे  कारखानदार   पाचोरा तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीच्या  बिनविरोध निवडून आलेले असून महिला मतदार संघातून सौ रेखा मथुरवैश्य श्रीमती लता जैन  तर श्री विक्रांत पेंढारकर हे  राखीव   मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत इतर मागासवर्गीय मतदारसंघासाठी निवडणूक झाली असता श्री भूषण दिलीप वाघ हे मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत वरील पदाधिकार्‍यांच्या निवडी बद्दल पाचोरा तालुक्याचे माजी आमदार माननीय दिलीप भाऊ वाघ आमदार यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला . राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष नितीन तावडे तालुकाध्यक्ष विकास पाटील  सहकारी औद्योगिक संस्थेच्या सदस्यांनी सर्व संचालकांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे