पाचोरा येथे प्रलंबित महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक करण्यासाठी ओबीसी नेते अनिल महाजन यांच्यासह पाचोरा येथील माळी समाज व ओबीसी समाज बांधव आक्रमक

पाचोरा येथे प्रलंबित महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक करण्यासाठी ओबीसी नेते अनिल महाजन यांच्यासह पाचोरा येथील माळी समाज व ओबीसी समाज बांधव आक्रमक.
पाचोरा येथे महात्मा ज्योतिबा फुले स्मारक व्हावे या प्रलंबित विषयासाठी आज ओबीसी नेते,अनिलभाऊ महाजन व सर्व माळी समाज पंच मंडळाचे पदाधिकारी कार्यकारणी यांनी महात्मा जोतिबा फुले स्मारक बाबत तक्रारदार रमेश वाणी यांच्यासोबत बैठक झाली त्यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे हे उपस्थित होते.
पाचोरा येथे महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाबाबत प्रलंबित असलेल्या विषयाला पुन्हा गती आली आहे. पाचोरा नगरपालिकेने ज्योतिबा फुले यांच्या स्मारकासाठी ठराव करून दिलेल्या जागेवर स्टेशन रोड येथे हुतात्मा स्मारकाच्या बाजूला नियोजित जागेवर स्मारक होण्यास विलंब होत आहे. पाचोरा नगरपालिकेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे की सदर जोतिबा फुले स्मारक नियोजित जागेत करू नये. याबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पाचोरा भाजप शहर अध्यक्ष रमेश वाणी यांची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यामुळे या स्मारकाला विलंब होत आहे भाजपचे शहराध्यक्ष रमेश वाणी यांनी व्यापारी गाळे धारकांना अडचण निर्माण होत आहे व स्वत: रमेश वाणी यांचे दुकान त्या नियोजित जागेच्या पाठीमागील शॉपिंग सेंटर मध्ये आहे. त्यामुळे सदर फुले स्मारक इतर जागेवर करावे असे रमेश वाणी यांचे म्हणणे आहे.

त्याकरिता आज भारतीय जनता पार्टी कार्यालय पाचोरा येथे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व शहराध्यक्ष रमेश वाणी यांच्याशी सर्वपक्षीय माळी समाज व बहुजन समाजाच्या समाज बांधवांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला ओबीसी नेते व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिलभाऊ महाजन यांच्या सोबत पाचोरा माळी समाज पंचमंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व शहरातील प्रतिष्ठित समाज बांधव सदर बैठकीला उपस्थित होते. बराच युक्तिवाद झाल्यानंतर नंतरही रमेश वाणी हे ऐकायला तयार नाहीत कायदेशीर प्रक्रिया दाखवत आहेत व स्मारकसाठी इतर जागा सुचवत आहेत. भाजपा तालुकाध्यक्ष भाजप तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांनी मध्यस्थी करत रविवार दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता महात्मा ज्योतिबा फुले समारक नियोजित जागेवर प्रत्यक्ष पाहणी करून नगरपालिका इंजिनियर व माळी समाज बांधव व सर्वपक्षीय प्रमुख नेते उपस्थित राहून सदर स्मारकाबाबत मार्ग काढून ज्योतिबा फुले यांचे स्मारक बांधण्याबाबत योग्य तो निर्णय सर्व मिळून घेऊया असे आजच्या बैठकीत ठरले. अनिल महाजन व पाचोरा माळी समाज व बहुजन समाजचे सर्व कार्यकर्ते न.पा ने ठराव केलेल्या नियोजित जागेवरच जोतिबा फुले यांचे स्मारक व्हावे या मतावर ठाम आहेत.