Home पाचोरा तालुका गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणमहर्षी तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांची १०८...

गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणमहर्षी तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांची १०८ वी जयंती उत्साहात साजरी…!!!!!

_गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणमहर्षी तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांची १०८ वी जयंती उत्साहात साजरी…!!!!!_

 

कोळगाव ता.भडगाव(वार्ताहर)-कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे उघडून ज्ञानाची गंगोत्री निर्माण करणाऱ्या कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष “स्व.तात्यासाहेब हरी रावजी पाटील” यांची १०८ वी जयंती उत्साहात पार पडली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य आर आर वळखंडे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात स्व.तात्याबाबा यांच्या प्रतिमेस श्रीफळ,पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले,यावेळी स्थानिक शाळा समिती सदस्य संभाजी अरविंद पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण बोरसे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य आर आर वळखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी परिश्रम घेतले.

Don`t copy text!