श्री गो. से. हायस्कूलच्या दर्शनी फलकावर स्व.अजित दादांना चित्रमय श्रद्धांजली “माझा आनंद हरपला”
पाचोरा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्व.अजित दादांच्या दुःखद निधनाने सारा महाराष्ट्र हळहळला. श्री. गो. से.हायस्कूल पाचोरा शाळेच्या दर्शनी भिंतीवरील ब्लॅक बोर्ड वर स्व.अजित दादांचे फलकलेखन शाळेचे कलाशिक्षक सुबोध मुरलीधर कांतायन यांनी रंगीत खडू व पेपरच्या माध्यमातून साकारले.दादांचे जाणे हे प्रत्येकाच्या मनाला चटके देऊन गेले… आईला किती मोठा आघात देऊन गेला हे सांगूच शकत नाही.दादा..सदैव पांडुरंगाचे नामस्मरणं करायचे.. त्यामुळे आईने पांडुरंगाला मुलासारखे जवळ घेतलेले चित्रात दाखवले आहे. यात पांडुरंगाला हे सांगायचे आहे की माझ्या अजित दादा ला तुम्हीपण आईची माया द्यावी.आईच्या मायेत खरोखर संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले असते. दादा स्वर्गाच्या दारात प्रवेश करताना दादांची चालतानांची लकब चित्रात सुरेख पद्धतीने चित्रित करण्यात आली. स्वर्गाचे दार आणि ढगांचा इफेक्ट सुंदर रित्या खडूच्या माध्यमातून हुबेहूब सरांनी साकारला आहे.पेपर कटिंग च्या माध्यमातून दादांचे व्यक्तीचित्रण साकारले आहे.सरच नाहीतर शाळेची विद्यार्थिनी धनश्री पाटील हिने सुद्धा पेपर कटिंगच्या माध्यमातून पि.टी.सी संस्थेचे चेअरमन मा.संजय वाघ यांचे सुरेख व्यक्तीचित्रण साकारले होते. विद्यार्थी सुद्धा ब्लॅकबोर्ड रंगवायला लागले आहेत.
पी.टी.सी.संस्थेचे अध्यक्ष आणि माजी आमदार दिलीपभाऊ वाघ,चेअरमन संजय वाघ, मानद सचिव. ॲड.महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन व्ही. टी.जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख,तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांनी सुबोध कांतायन सरांनी केलेल्या फलकलेखनाचे कौतुक केले. सोबतच विद्यार्थ्यांच्या कला या विषयाबद्दलची गोडी व आस्था निर्माण झाल्याबद्दल सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

























