महाराष्ट्र विधान परिषदेसाठी भाजपच्या ११ जणांना पायघड्या टाकून उमेदवारीची खिरापत,नगर मधुन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे,तर बीड-लातूर मधुन बसवराज पाटील, संभाजी नगर -जालना मधुन सुहास शिरसाट

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
महाराष्ट्र विधान परिषदेसाठी केंद्रीय भारतीय जनता पार्टी कार्यालयाने ११ जणांना पक्षात पायघड्या टाकून उमेदवारीची खिरापत वाटली आहे.१)अहिल्या नगर मधुन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे,२) धाराशिव-लातूर-बीड मधुन बसवराज पाटील,तर ३) संभाजी नगर -जालना मधुन सुहास शिरसाट यांच्या नावाची उमेदवारी साठी घोषणा करण्यात आली आहे.तसेच ४)जळगाव मधुन नंदकिशोर महाजन ,५) सोलापूर मधुन राजेंद्र राऊत,६) नांदेड मधुन अमर राजूरकर,७) सांगली-सातारा मधुन धैर्यशील कदम,८)भंडारा -गोंदिया मधुन अविनाश ब्राह्मणकर,९) नागपूर मधुन डॉ राजीव पोतदार आणि १०)वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मधुन अरुण लखाणी,११) अमरावती मधुन प्रविण पोटे पाटील या आकरा उमेदवारांना भाजपाने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.भाजपच्या केंद्रीय कार्यालयांचे राष्ट्रीय प्रभारी महासचिव अरुण सींह यांच्या सहीने ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.अहिल्या नगर जिल्ह्यात भाजप कडून विधान परिषदेची उमेदवारी मिळण्यासाठी अनेक जणांनी गुढग्याला बाशिंग बांधुन उमेदवारी साठी देव पाण्यात बुडवून ठेवले होते. मीच कसा लायक उमेदवार आहे हे सांगायला सुरुवात केली होती.अहिल्या नगर जिल्ह्यात इच्छुकांच्या भाउ गर्दीची भलीमोठी लांब लचक यादी जाहीर करण्यात आली होती.पण प्राजक्त तनपुरे यांनी थेट भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे.त्यांच्या नावावर केंद्रीय कार्यालयाने शिक्कामोर्तब केले आहे.त्यामुळे आता अनेकांना आपल्या तलवारी म्यान करून ठेवाव्या लागणार आहेत.उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत,माजी खासदार सुजय विखे,त्यांच्या सौभाग्यवती धनश्रीताई विखे यांच्या सह कर्डिले,कोतकर, जगताप,कदम, घुले,गडाख, ढाकणे आणि वगैरे वगैरे यांच्या नावाची चर्चा सुरू होती.त्या चर्चेला आता पुर्ण विराम मिळाला आहे. प्राजक्त तनपुरे हे अनुभवी उमेदवार आहेत.माजी मंत्री आहेत.तनपुरे यांच्या उमेदवारीची घोषणा होताच संपूर्ण अहिल्या नगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीतील डॉ सुजय विखे पाटील यांच्या भाजपच्या उमेदवारीत आडवे असलेले काटे आता दुर झाले आहेत. सुजय विखे पाटील पुन्हा एकदा नव्याने खासदार होतील या बद्दल तीळमात्र शंका नाही असे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.अहिल्या नगर जिल्ह्यात विधान परिषदेसाठी ४६१ मतदार आहेत. आणि किंग मेकर पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आहेत,सर्वात जास्त नगरसेवक हे भाजपचे आहेत त्यामुळे आता प्राजक्त तनपुरे यांचा विजय निश्चित मानला जातो.
























