स्व.राजीव राजळे यांच्या जयंती निमित्त न्यु इंग्लिश स्कूल येथे ४७ बॅगा रक्तदान संकलन 

स्व.राजीव राजळे यांच्या जयंती निमित्त न्यु इंग्लिश स्कूल येथे ४७ बॅगा रक्तदान संकलन

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) ‌‌ ‌ शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघांच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांचे पती माजी आमदार स्वर्गीय राजीवजी राजळे यांच्या ५६ व्या जयंती निमित्त आदिनाथ नगर येथील न्यु इंग्लिश स्कूल येथे ४७ बॅगा रक्त संकलीत करण्यात आले.अहिल्या नगर येथील जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्त संक्रमित करण्यात आले.जिल्हा रुग्णालयाच्या सिव्हिल सर्जन आणि रक्तपेढी प्रमुख डॉक्टर सुमय्या खान यांच्या वैद्यकीय पथकाने हे रक्त संकलन केले. राजीव राजळे मित्र मंडळ यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन वृद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी राजू सुरवसे सर यांच्या वतीने न्यु इंग्लिश स्कूल येथील शालेय विद्यार्थ्यांना मिठाई आणि वह्यांचे वाटप करण्यात आले.तसेच या राजीव राजळे मित्र मंडळचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर राजळे यांनी रक्तदात्यांना रक्त दान केल्या बद्दल प्रमाणपत्र ही दिले.सीव्हील हाॅस्पीटलच्या वतीने डॉक्टर गर्जे,संपत आंधळे, अभिजित खरात, प्रियांका देऊळवाड,रोहीणी दिवटे,दिपक पवार,सुहाणी विखे,वेदांती देशमुख,रुपाली दुसुंगे,मोहन पोकळे,विशाल चावरे,चालक अशोक पवार या सर्व डॉक्टरांच्या पथकाने रक्तदानासाठी विषेश सहकार्य केले.या प्रसंगी रामकिसन काकडे,कार्यकारी संचालक नितीन शिंदे,रविंद्र महाजन,चारूदत वाघ,विलास गजभिव, मुख्याध्यापीका सौ. शिला नाथन, अशोक काळे,अरुण कराळे,मिलिंद गायकवाड,प्रशांत राजळे, बाळासाहेब राजळे,सोनाली जवने,अर्चना जेधे,कावेरी चितळे,आदिनाथ वाघ,रामदास म्हस्के,प्रमोद काकडे,गणेश चितळे, बाळासाहेब म्हस्के,भागवत खरड,रमेश भुसारी,गणेश काकडे,ज्ञानेश्वर हरार,अभिजित राजळे,रविंद्र दुधमल,सौरभ शेळके,श्रीकांत मिसाळ, बाबासाहेब किलबिले,संदिप नेहूल,अर्जून नेहुल,बाळासाहेब गोल्हार,गोरे साहेब इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाथर्डी तालुक्यातील अनेक ठिकाणी विविध उपक्रमांनी हा जयंती सोहळा साजरा करण्यात आला.