पाचोर्‍यात अभा ब्राह्मण महासंघातर्फे सामूहिक ‘व्रतबंधा’ चा कार्यक्रम उत्साहात संपन्न

पाचोर्‍यात अभा ब्राह्मण महासंघातर्फे सामूहिक ‘व्रतबंधा’ चा कार्यक्रम उत्साहात संपन्न

पाचोरा –येथील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे प्रथमच सामूहिक  ‘व्रतबंधा'(मौंज) च्या संस्काराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथील स्वामी लॉन्स कार्यालयात ब्राह्मण समाजातील ७ बटूंचा  व्रतबंधाचा कार्यक्रम सामूहिक रित्या आयोजित करण्यात आला होता. यात श्रेयश जोशी, लक्ष्मीकांत हरणे, वेदांत पाटील, स्वप्नजीत हरणे, नितीन पाटील, सचिन नाईक, आदित्य पाटील, या ७ बटूंचा  व्रतबंध संस्काराचा कार्यक्रम शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झाला. यावेळी वे शा सं वैभव जोशी यांनी पौरोहित्य केले. यावेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष मुकुंदबिलदीकर, भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे ,शिवसेना उबाठाच्या वैशाली सूर्यवंशी, रमेश बाफना, माजी प स सभापती बन्सीलाल पाटील, नंदू सोमवंशी, दत्ता पाटील, सिनेट सदस्य व्हीटी जोशी, दिनेश बोथरा, आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी बटूंची सामूहिक मिरवणूक काढण्यात आली. मंगलाष्टके म्हणत विधी संपन्न झाला. गजानन जोशी यांचेकडून भोजन व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी ब्राह्मण महासंघाचे गिरीश कुलकर्णी, किशोर पुराणिक, संजय अवचितराव कुलकर्णी, सागर तांबोळी, दिनेश पाटील, गिरीश खंडेलवाल, राजू खंडेलवाल, भरत खंडेलवाल, गोवर्धन खंडेलवाल, पुरुषोत्तम खंडेलवाल, गजानन जोशी,विशाल दीक्षित,महेश कौंडिण्य,गिरीश बर्वे,प्रदीप कौंडिण्य, प्रशांत कौंडिण्य, राम शर्मा, गिरीश भट, संदीप सराफ, ऍड सचिन देशपांडे, विजय पाठक, शामकांत सराफ, खुशाल पाटील, संदीप शहापूरकर, सुजित तिवारी ,भूषण जोशी, संतोष जोशी,भूषण सोले,संजय बडोला, संजय संघवी, जीवन जैन,जगदीश खिलोशिया, संजय चोरडिया, रितेश ललवाणी,संदीप महाजन, अनिल आबा येवले,कृष्णा व्यास,विनोद कुलकर्णी, किशोर रायसाकडा, भरत तिवारी, अरुण ओझा आदी उपस्थित होते याशिवाय यात ब्राह्मण महिला मंडळांनी सक्रिय सहभाग घेतला. यात महिला मंडळाच्या अध्यक्षा हेमा पाटील, मयुरी बिलदिकर,गौरी कुलकर्णी, स्वाती जोशी, कल्याणी देशपांडे,राखी कुलकर्णी, स्मिता सराफ, स्वाती कुलकर्णी, पल्लवी कौंडिण्य, प्राजक्ता कौंडिण्य,गौरी भट, कीर्ती दीक्षित, सुनिता तिवारी ,राधिका हस्तक, पूजा दीक्षित, राधा शर्मा, क्षमा शर्मा, मधुरा पाठक ,सोनाली गौड ,ज्योती चोबे ,प्रीती पापरीकर, पूजा तळेगावकर ,कोमल जोशी, आदी महिलांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.