गणपती आणि ईदच्या मिरवणुकीत नगरमध्ये 80 डीजे कायम स्वरूपी जप्त,जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती
(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) नुकत्याच झालेल्या गणपती आणि ईदच्या मिरवणुकीत अहिल्यानगर येथे एकुण 80 डीजे कायम स्वरूपी जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी दिली.ते पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये शहरातील गणेश मंडळांना ” गणेश उत्सव स्पर्धा 2025″च्या पारीतोषिक वितरण सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे या होत्या.घार्गे साहेब पुढे म्हणाले की डीजे वाजवताना समाजाचा आणि लहान मुलांचा विचार केला पाहिजे.संपुर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी तालुका हा दिशादर्शक आणि अतिशय पथदर्शक ठरला आहे.पाथर्डीने डीजे बंदीच्या दिशेने टाकलेले हे चांगले पाऊल आहे. त्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आता कुठल्याही कार्यक्रमात डीजे वाजवल्यास कारवाई होणारच असे निक्षून सांगितल्या मुळे आता डीजे मालकावर गाषा गुंडाळण्याची वेळ आली आहे.पाथर्डीत गणेश उत्सव मिरवणूकीत डीजे वाजला नाही म्हणून पाथर्डी पोलिस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील एकूण 19 गणेश मंडळांना ट्राॅफी, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रथम बक्षीस हे पाथर्डी शहरातील सुवर्ण युग तरुण मंडळाला देण्यात आले आहे.द्वितीय बक्षीस तिसगाव येथील सिद्धिविनायक गणेश मंडळांला देण्यात आले आहे.तर तिसरे बक्षीस पाथर्डी शहरातील शेवाळे गल्लीतील श्रीराम मंडळाला देण्यात आले आहे.उत्तेजनार्थ बक्षिसे संत वामनभाउ तरुण मंडळ, दोस्ती तरुण मंडळ, सुवर्ण युग परीवार ट्रस्ट गणेश मंडळ,पावन गणपती प्रतिष्ठान कसबा पेठ, एकलव्य तरुण मंडळ,अष्टवाडा गणेश मंडळ, आदर्श नगर तरुण मंडळ,जयभवानी तरुण मंडळ,विश्वकर्मा तरुण मंडळ हे सर्व मंडळ पाथर्डी शहरातील आहेत.वक्रतुंड तरुण मंडळ करंजीतील, कोल्हेवाडी, तर जयभद्रा गणेश मंडळ,कोरडगाव अशा एकूण 11मंडळांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.तसेच “एक गाव एक गणपती” या मुद्यावरही पाथर्डी तालुक्यातील राघो हिवरे येथील सांस्कृतिक क्रीडा मंडळ,भोसे येथील जय हनुमान तरुण मंडळ,घुमटवाडी येथील गहिनीनाथ तरुण मंडळ, बोरसेवाडी येथील हनुमान गणेश मंडळ, मुंगुसवाडे येथील शिवसिद्धेश्वर गणेश मंडळ,या 5 मंडळांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.अशा एकूण एकोणीस उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गणेश मंडळांना पारीतोषीक वितरण करण्यात आले.या वेळी तात्पुरता अधिभार असलेले शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश उगले साहेब, प्रांताधिकारी प्रसादजी मते साहेब, तहसीलदार उद्धव नाईक,ए एस आय नितीन दराडे,पि एस आय गुट्टे साहेब,पि एस आय ढाकणे साहेब,पोलिस कॉन्स्टेबल नागेश वाघ,बुधवंत, जाधव,इलग, सय्यद इत्यादी पोलिस अधिकारी उपस्थित होते.प्रारंभी पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी प्रास्ताविक केले. आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले की डीजे वाजवू न दिल्याने तालुक्यातील अनेक गणेश मंडळ नाराज झाले आहेत.परंतू प्रशासना कडून हे डीजे बंदीचे उचललेले पाऊल तालुक्याच्या द्रुष्टीने अतिशय प्रशंसनीय बाब आहे.पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी डीजेमुक्त मिरवणूक काढल्यामुळे पाथर्डी तालुक्यातील सर्व गणेश मंडळाचे कौतुक केले आहे.पाथर्डी तालुक्यातील गणेश मंडळाचा आदर्श जिल्ह्यातील इतर मंडळांनी घ्यावा असे आवाहन ही त्यांनी केले. शेवटी पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार, आणि मीरी परीसरातील गणेश तरुण मंडळांनी या स्पर्धेबाबद उदासीनता दाखविली अशी खंत पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी व्यक्त केली.