के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला शैक्षणिक भेट

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला शैक्षणिक भेट

 

 

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला शैक्षणिक भेट:—– खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी डेटा साइन्स चे विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा व पुस्तक दीना निमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील वाचनालयाला भेट दिली . विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य ,विज्ञान ,अभियांत्रिकी ,संशोधनपर पुस्तक बघितली .व पुस्तकातील माहितीचा गोषवारा समजून घेण्याचा प्रयत्न केला .त्यानंतर महात्मा गांधी अभ्यास आणि संशोधन केंद्र ला भेट दिली असता महात्मा गांधी यांची दुर्मिळ छायाचित्र दिसून आली त्यातून गांधीजींच्या विचारसरणीचा आणि कार्याचा प्रसार समजावून घेतला . नंतर विद्यापीठातील मुख्य प्रशासन विभागाला भेट दिली प्रत्येक विभागातील माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांत केंद्रीय विद्यालयाच्या बाजूला असलेले हनुमंत खोरे इथं भेट देऊन जेवणाचा आस्वाद घेतला,वाचनालयातील विभाग प्रमुख डॉ.विजय आहेर यांनी विविध प्रकारची पुस्तक व लेखक या बद्दल मार्गदर्शन केले . तसेच विद्यापीठातील बांधकाम उपअभियंता प्रा. राजेश पाटील व त्यांचे सहयोगी प्रा. हिम्मत जाधव यांनी शैक्षणिक भेटीची परवानगी देऊन विद्यापीठातील परिसराबद्दल मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य .डॉ संजय सुगंधी यांनी प्रोत्साहन दिले . या शैक्षणिक भेटीचे आयोजन प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. के बी पाटील व प्रा. विजय एन चौधरी यांनी केले . कार्यक्रमाच्या यश्वीतेसाठी प्रा मधुमती अहिरराव ,प्रा. कल्पना राठोड ,प्रा दिनेश अहिरराव यांनी परिश्रम घेतलॆ .