शिंदे इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी अँड रिसर्च येथे फ्रेशर पार्टी उत्साहात

शिंदे इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी अँड रिसर्च येथे फ्रेशर पार्टी उत्साहात

पाचोरा – येथील नामांकित गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी अँड रिसर्च मधील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर पार्टी आयोजित करण्यात आली होती. या फ्रेशर पार्टीत धमाल मस्ती सोबतच, शिक्षक- विदयार्थी आणि अभ्यासक्रमाची ओळख तसेच फार्मसी कोर्स संबंधातील सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, शिंदे इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य विजय पाटील उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास शिंदे इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी अँड रिसर्च चे प्राचार्य डॉ. मनोज पाटील,उपस्थित होते , डॉ मनोज पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी मधील विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.जयश्री बोरसे, प्रा उज्वल महाजन व समाधान बोरसे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल शिंदे , दिव्या धाकरे, मनीषा चव्हाण, सुफीयान रंगरेज याने केले. प्रा. उज्वल महाजन यांनी आभार मानले.