स्व.लता मंगेशकर यांची करीयर ची सुरवात पाचोऱ्यातून : विनम्र अभिवादन

स्व.लता मंगेशकर यांची करीयर ची सुरवात पाचोऱ्यातून : विनम्र अभिवादन

पाचोरा (प्रतिनिधी) – जगाच्या संगितावर राज्य करणाऱ्या भारतरत्न गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांच्या कार्गिदीला सुरवात पाचोर्यातुन झाली आहे

देशाने भारतरत्न पुरस्कार देऊन ज्यांना सन्मान दिला त्या गानसम्राज्ञी म्हणून लतादीदींना अख्खा देशावर राज्य केले. ज्या गाण्यामुळे त्यांनी हे यश मिळवले त्या गाण्याच्या करीयरची सुरवात जळगाव जिल्ह्य़ातील पाचोरा शहरातुन केली आहे. मंगेशकराची त्या काळात आर्थिक परिस्थिती बिकट होती म्हणून गावां गावत जाऊन आपली कला सादर करीत होते. १९३५ च्या दरम्यान लतादीदींचे वडील स्व. दिनानाथ मंगेशकर यांच्या बरोबर सौभद्र नाटकाच्या निमित्ताने पाचोरा शहरात आले असता नाटकाच्या शो रात्री होता मात्र त्यावेळी नाटकातील नारदाची भुमिका करणारे पात्र आजारी झाले होते तेव्हा त्यांचे वडील खुप टेन्शन मध्ये असतांनाच स्वतः लतादीदींनी मी नारद होवु का म्हणून विनंती केली तेव्हा वडील म्हणाले अर्जुन किती मोठा आणि नारद लहान तरी पर्याय दुसरा नसल्याने शेवटी लतादीदींना नारदाची भुमिका करायला लागली आणि यात जे गाणे म्हटले त्या गाण्याला वन्समोर देखील मिळाला. ही आठवण आपल्या तरुण पणातील एका मुलाखतीत त्यांनी बोलुन दाखवली सदर व्हिडीओ पाचोरा साठी अभिमानाचा विषय असल्याने तो कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी संग्रही ठेवला आहे.

लतादीदींच्या जीवनातील पहीलीच संधी पाचोरेकरांनी दिली याचा अभिमान वाटतो आणि त्यांनीच तो बोलुन दाखवला त्यात परीस्थिती बिकट होती होती याचा उल्लेख केला हा मोठेपणा लतादीदींना यातुन दिसुन योगायोग त्यांचे आजोळ खान्देशातील थाळनेर चे आहे. त्यांच्या जाण्याने रुपेरी पडद्यावर एक पर्व संपले आहे त्यांचा आवाज अजरामर राहणार आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सचिन सोमवंशी यांनी व्यक्त केली आहे