पाचोरा शहर युवा सेना तर्फे कुस्तीगीर दिनानिमित्त भव्य सत्कार सोहळा

पाचोरा शहर युवा सेना तर्फे कुस्तीगीर दिनानिमित्त भव्य सत्कार सोहळा

 

आज 23 मे रोजी जागतिक कुस्तीगीर दिनानिमित्त राम मंदिर येथे महावीर व्यायाम शाळा येथील सर्व कुस्तीगीर बांधवांचे पाचोरा भडगाव मतदार संघाच्या शिवसेनेच्या नेत्या सौ वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली व युवा सेना पाचोरा तर्फे सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रभू राम मंदिराचे अध्यक्ष श्री मयूर भाऊ शेलार पाचोरा तालुका कुस्तीगीर मंडळाचे अध्यक्ष कैलास भाऊ आमले व संभाजी ब्रिगेडचे राजू भाऊ पाटील दिनेश भाऊ पाटील युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप जैन तालुकाप्रमुख भूपेश सोमवंशी शहर संघटक प्रशांत सोनार एडवोकेट गौरव दादा पाटील युवा सैनिक शुभम पाटील व युवा सेने चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते युवा सेना उपजिल्हाप्रमुख संदीप जैन यांनी सर्व बालगोपाल कुस्तीगीरांचे सत्कार करून त्यांच्या लहान वयात ज्या पद्धतीने ते तालीम करीत आहेत खरोखरच भविष्यात आपल्या देशाचे नाव अभिमाने उंचावेल याप्रसंगी सर्व बालगोपाल कुस्तीगरांचे कौतुक करून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व ज्येष्ठ कुस्तीगरांचे मनापासून आभार मानले की तुमच्यासारख्या जेष्ठ कुस्तीगीरांच्या माध्यमातून हे बालगोपाल आज इथं ज्या पद्धतीने तालीम करीत आहे म्हणून माझ्या सर्व युवा बांधवांना मी विनंती करतो की मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहून जर प्रत्येकाने एक तास व्याया मा साठी दिला व तालीमसाठी दिला तर ते आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरेल याचा सर्वांनी विचार करावा अशा पद्धतीने हा छोटे खानि कार्यक्रम राम मंदिरात संपन्न झाला व सगळ्यांना परत मनापासून शुभेच्छा दिल्या