महाराष्ट्र वाणी युवा मंचच्या स.न.2022 या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न

दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न पाचोरा शहरातील महाराष्ट्र वाणी युवा मंचच्या स.न.2022 या दिनदर्शिकेचे प्रकाशन वाणी समाजाचे माजी सचिव व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.पुंडलिक शंकर देव यांच्या शुभहस्ते झाले.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखेचे संस्थापक अध्यक्ष श्री.डी.आर.कोतकर सर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखाध्यक्ष श्री.अशोक बागड यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.श्री.लक्ष्मण सिनकर यांनी केले. प्रा.श्री.राजेंद्र चिंचोले यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात माजी उपनगराध्यक्ष श्री.शरद पाटे तसेच श्री.योगेश शेंडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.महेंद्र महालपुरे (उपाध्यक्ष),श्री.रमेश महालपुरे (खजिनदार),श्री.विजय सोनजे, श्री.प्रवीण शेंडे,श्री.संदीप महालपुरे,श्री.विशाल ब्राह्मणकार यांनी अथक परिश्रम घेतले. आभार प्रदर्शनाचे काम श्री.किरण अमृतकर (ज्येष्ठ संघटक) यांनी केले.सदर कार्यक्रमास श्री.संजय पुंजू शेंडे,श्री.राजेंद्र देव,श्री.विवेक ब्राह्मणकर,श्री.प्रकाश येवले,श्री.गणेश सिनकर श्री.सुनील कोतकर आणि समाजबांधव उपस्थित होते.