आमदार मोनिकाताई राजळे यांचे पिताश्री स्व.अशोकराव पाटील डोणगावकर यांच्या सरपंच ते मंत्री पदाच्या यशस्वी कारकीर्दीला सास्रुपुर्ण नयनांनी पोलीसांच्या सलामीने अखेरचा दंडवत
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांचे पिताश्री अशोकराव पाटील डोणगावकर यांच्या सरपंच ते मंत्री पदाच्या यशस्वी कारकीर्दीला आषाढी एकादशीच्या दिवशी अखेर सास्रुपुर्ण नयनांनी आणि राज्यभरातून आलेल्या हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत पोलीसांच्या बंदुकीच्या हवेतील फैरीच्या शेवटच्या सलामीने अखेरचा निरोप देण्यात आला.दिनांक ११ नोव्हेंबर १९४३ साली जन्मोदय झालेल्या डोणगावकर नावाच्या एका झंझावाती वादळी युगपुरुषाचा शनिवार दिनांक ५ जुलै २०२५ रोजी भर दुपारी सुर्यास्त झाला. संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याचे आणि डोणगाव करांचे भुषण व भाग्यविधाते असलेल्या माजी मंत्री स्व.अशोकराव राजाराम डोणगावकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर त्यांचे सुपुत्र किरण पाटील डोणगावकर यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला.त्यांनी शैक्षणिक,उद्योग, व्यापार, राजकारण आणि समाजकारण या सर्व क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा जनमानसात वेगळा असा ठसा उमटवला होता.आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना अनेकांना आपले अश्रू अनावर झाले होते.श्रद्धांजलीपर भाषणात अनेक वक्त्यांनी स्व.अशोक पाटील डोणगावकर यांच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या नांदुर मध्यमेश्वर कालव्याच्या निर्मितीनंतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पिकांची हिरवळ फुलवल्याचे सांगितले.टेंभापुरी आणि शिल्लेगाव मध्यम प्रकल्प, खुलताबाद,गंगापूर या दोन्ही तालुक्यात अनेक पाझर तलाव,शिवरस्ते,जोड रस्ते,सरकारी दवाखाने, नागपूर ते मुंबई हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, गोरगरिबांच्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणारी पंढरपूर वाळुंज एमआयडीसी उभारणीचे काम आणि इतरही ठिकाणी केलेल्या अनेक विकास कामात अशोकराव पाटील डोणगावकर यांचा सींहाचा वाटा होता असे आवर्जून सांगितले. स्व.अशोकराव पाटील डोणगावकर यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून सकाळी अकरा वाजता काढण्यात आली होती. अशोकरावांचा देह तिरंगी कापडाच्या राष्ट्रध्वजात लपेटण्यात आला होता.अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर पोलिस प्रशासनाने हवेत तिनं फैरी झाडून त्यांना सरकारी इतमामाने अखेरच्या सलामीची मानवंदना देण्यात आली.या प्रसंगी सरकारी नियमानुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्व.अशोकराव पाटील डोणगावकर यांना पुष्पचक्र अर्पण केले.प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीनेही उपविभागीय अधिकारी डॉ.अरूण जर्हाड, आणि गंगापूरचे तहसीलदार नवनाथ वागवाड यांनी पुष्पचक्र अर्पण केले.या प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार सुधीरजी तांबे, खासदार कल्याण काळे,संदिपान भुमरे,आमदार प्रशांत बंब,आ.सतिश चव्हाण,आ.रमेश बोरनारे,आ.सिमाताई हिरे,आ.अब्दुल सत्तार, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार कीशोर पाटील, नितीन पाटील, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, बीडचे माजी आमदार राजेंद्र जगताप, माजी आमदार अण्णासाहेब माने, माजी आमदार नामदेव पवार, उद्योगपती मानसींग पवार, शिक्षण उपसंचालक डॉ बी.बी.चव्हाण, पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, रविंद्र काळे, सुधाकर सोनवणे, विलास औताडे, भाऊसाहेब ठोंबरे, भगवान तांबे,लासुर स्टेशन बाजार समितीचे सभापती शेषराव जाधव, संभाजी नगर जिल्हा बॅंकेचे चेरमन अर्जुन गाडे, विनोद तांबे यांच्या सह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या निवासस्थानी विद्यमान मंत्री अतुल सावे, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, फुलंब्री तालुक्याच्या आमदार अनुराधा चव्हाण, माजी आमदार एम एम शेख यांनी अंत्यदर्शन घेतले.ज्ञानेश्वर चौधरी यांनी सुत्रसंचालन केले. या अंत्यविधीसाठी अहिल्यानगर, जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांचे समर्थक, आणि विरोधक, नाशिक जिल्ह्यातील सावंत परीवाराचे समर्थक यांच्या सह राज्यातील सामाजिक, धार्मिक,राजकीय, आणि प्रशासकीय अधिकारी वर्गातील अनेक मांन्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोकराव पाटलावर शासकीय इतमामाने होणाऱ्या अखेरच्या अंत्ययात्रेतील दर्शनासाठी डोणगावकरांच्या अनेक चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी लोटली होती.