पाथर्डी पोलिस स्टेशन तर्फे अंमली पदार्थ दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील अनेक शाळा महाविद्यालयात व्याख्यानमाला संपन्न

पाथर्डी पोलिस स्टेशन तर्फे अंमली पदार्थ दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील अनेक शाळा महाविद्यालयात व्याख्यानमाला संपन्न

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) भारत सरकारचे दिल्ली येथील केंद्रीय ग्रृहमंत्रालय आणि महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक व अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे,शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिस स्टेशनच्या हद्दीत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दिनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांमध्ये दिनांक १३ ते १६ ऑगस्ट या कालावधीत जनजागृती विषयक कार्यक्रमातून व्यसनमुक्ती विषयक माहीती देण्याची मोहीम हाती घेतली होती.पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालयात जाऊन अंमली पदार्थांच्या सेवनाने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयी व्याख्यानमाले द्वारे मार्गदर्शन केले.पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील कान्होबा उर्फ तांबुळदेव देवस्थान येथे गुरुवारी सकाळी आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे जवखेडे,कासार वाडी,मोहोज,मीरी, कामतशिंगवे या पंचक्रोशीतील गावातील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यावेळी पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी व्यसनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याची व्याख्यानाद्वारे सखोल माहिती दिली असता त्या व्याख्यानावर प्रभावित होऊन मोहोज बुद्रुक सोसायटीचे माजी चेअरमन नामदेव मारुती फसले यांनी मी आजपासून तंबाखूचे व्यसन सोडत आहे अशी कान्होबा देवाच्या साक्षीने शपथ घेतली.हेच या व्याख्यानाचे खरे फलीत होते.कानिफनाथ माध्यमिक विद्यालय,कै.रघुनाथ पाटील विद्यालय, महादेव मंदिर या ठिकाणी ही पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांचे व्याख्यान झाले.त्यांनी जागतिक स्तरावर भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो.परंतू आजचा युवक हा व्यसनाच्या विळख्यात अडकला आहे.त्यामुळे तो अनेक समस्यांना बळी पडत आहे असे सांगून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे.ते पिले की माणूस गुरगुरल्या शिवाय रहात नाही हा संदेश दिला.आजच्या सद्य परिस्थितीत शिक्षण ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.त्यातूनच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडू शकते.त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.असे पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी सांगितले. दादा पाटील राजळे महाविद्यालयात ही पोलिस उपनिरीक्षक निव्रुती आगरकर,पो.काॅं.नितिन दराडे यांनी व्याख्यानमालेस हजेरी लावली होती.तसेच पुजारी साहेब यांनी पाथर्डी शहरातील श्रीतीलोक जैन विद्यालय येथे,ही वि़द्यार्थी विद्यार्थिनी यांना, संबोधित केले होते तेथेही प्राचार्य, शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन सुनिल कटारीया यांनी तर आभार पर्यवेक्षिका मनिषा मिसाळ यांनी मानले.एकंदरीत पाथर्डी तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्वच दुर क्षेत्रातील बीटमध्ये या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दिनाच्या निमित्ताने व्याख्यानमाला संपन्न झाली.