होऊ द्या चर्चा कार्यक्रमाची नियोजन बैठक संपन्न

होऊ द्या चर्चा कार्यक्रमाची नियोजन बैठक संपन्न

पाचोरा-भडगाव, एरंडोल- पारोळा व चाळीसगाव मतदार संघातील शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील नाकर्ते, बेजबाबदार भूलथापा देणाऱ्या सरकारची पोलखोल करण्यासाठी तथा बोलघेवड्या योजनाच्या भांडाफोड करण्यासाठी *होऊ द्या चर्चा* या कार्यक्रमाचे गावोगावी, शहरो शहरी चर्चा करण्यासाठीच्या नियोजनासाठी दिनांक 16/09/2023 शनिवार रोजी दुपारी 4:00 वाजता शिवतीर्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पाचोरा येथे शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख मा, श्री. गुलाबरावजी वाघ तथा जिल्हाप्रमुख मा. श्री डॉ. हर्षल माने, जिल्हाप्रमुख मा. श्री दीपक राजपूत, जिल्हा संघटिका सौ. महानंदा ताई पाटील, व मा. सौ. वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना नेत्या पाचोरा भडगाव, जिल्हाधिकारी युवा सेना मा. श्री निलेश चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी मा. श्री गुलाब रावजी वाघ, सो. महानंदाताई पाटील, डॉक्टर हर्षल माने, श्री दीपक सिंग राजपूत, अरुण पाटील, निलेश चौधरी, आर व्ही पाटील, आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले शिवसेना पक्ष प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजसेवा 20% राजकारण या महामंत्राचा वारसा जोपासणारा शिवसेना (उबाठा) पक्ष असून महाआघाडीच्या कार्यकाळातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना समाज हिताचे शेतकरी, कामगार आणि सर्व समाजाच्या हिताचे निर्णय घेतले, कोरोना काळातील कुटुंब प्रमुखांची भूमिका निभवणारे तथा शेतकरी कर्जमाफी आदी निर्णयाबाबत देश पातळीवर उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून ज्यांचा गौरव झाला असे राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य मान्यवरांनी नमूद केले. मिंदे सरकारचा भांडाफोड केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले. आभार प्रदर्शन उद्धव मराठे यांनी मांडले तर सूत्रसंचालन राजेंद्र राणा यांनी केले. यावेळी पाचोरा-भडगाव, एरंडोल-पारोळा, चाळीसगाव आदि मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.